शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

अनैतिक संबंधातून IAF अधिका-याची हत्या, मृतदेहाचे केले तुकडे

By admin | Updated: February 22, 2017 09:38 IST

हवाई दल अधिका-याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना भतिंडा जवळच्या भीसीआना हवाई तळावर घडली.

 ऑनलाइन लोकमत 

भतिंडा, दि. 22 - सहका-याच्या पत्नीबरोबर प्रेमसंबंध ठेवणा-या हवाई दल अधिका-याची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना भतिंडा जवळच्या भीसीआना हवाई तळावर घडली. विपन शुक्ला (27) असे मृत अधिका-याचे नाव आहे. विपनचे  हवाई दलात सार्जंट असलेल्या सुलेश कुमारची पत्नी अनुराधा पटेलबरोबर प्रेमसंबंध होते. 
 
त्यातून सुलेश त्याची पत्नी अनुराधा आणि मेहुणा शशी भूषण या तिघांनी मिळून विपनची हत्या केली. भूषण बहिण अनुराधाला भेटायला आलेला असताना हा गुन्हा घडला. 8 फेब्रुवारीच्या रात्री तिघांनी मिळून विपनची हत्या केली. विपन शुक्लाची पत्नी कुमकुमने 9 फेब्रुवारीला बालुआना पोलिस स्थानकात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 
 
पोलिस श्वानांच्या मदतीने हवाई तळावरील निवासस्थानांच्या ठिकाणी शोध घेत असताना  श्वान त्यांना सुलेश कुमारच्या घरी घेऊन गेले. तिथे सुलेश कुमारच्या घरातील कपाट आणि फ्रिजमधून 16 प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरलेले विपन शुक्लाच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. विपनची 2014 मध्ये भीसीआना हवाई तळावर नियुक्ती झाली होती. त्याने इथे पत्नीला सोबत आणले नव्हते. 
 
त्या दरम्यान त्याची अनुराधा पटेलशी ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात होऊन दोघांमध्ये शरीरसंबंध निर्माण झाले. अनुराधाने विपनला लग्नाबद्दल विचारले तेव्हा त्याने नकार दिला. अखेर तिने पती सुलेशला त्यांच्यामध्ये असलेल्या संबंधांबद्दल सांगितले. त्यानंतर त्यांनी विपनच्या हत्येचा कट रचला. सुलेशने 8 फेब्रुवारीला विपनला आपल्या घरी बोलावले. तिथे तिघांनी मिळून विपनची हत्या केली आणि एका लोखंडी पेटीत त्याचा मृतदेह टाकला. सुलेश 19 फेब्रुवारीला दुस-या निवासस्थानी रहायला गेला. तिथे त्यांनी मृतदेहाचे तुकडे करुन 16 बॅग्समध्ये भरले व बॅग फ्रिजमध्ये ठेवली.