शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खून प्रकरणातील तिघांना जन्मठेप - असिफ पटेल खून प्रकरण

By admin | Updated: December 31, 2014 18:57 IST

नेवासा : (अहमदनगर) चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असिफ पटेल खून प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़

नेवासा : (अहमदनगर) चार वर्षांपूर्वी झालेल्या येथील असिफ पटेल खून प्रकरणातील नऊ पैकी तीन आरोपींना जन्मठेप व २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ तर पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली़ नेवासा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद कुलकर्णी यांनी हा निकाल दिला़ सोपान ऊर्फ सोप्या भगवान गाढे (वय २२), धनू ऊर्फ धनंजय ऊर्फ गोविंद अशोक काळे (वय २२) व बिट्टू ऊर्फ अनिल चिमाजी लष्करे (वय ३२) या तीन आरोपींना जन्मठेपेसह २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला़ दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली़ दरम्यान याच गुन्ह्यात फरार असलेला व काही दिवसापूर्वी पोलिसांनी अटक केलेला आरोपी सोन्या ऊर्फ सुनील मोहन परदेशी याच्यावर सुरू असलेला खटला प्रलंबित आहे.दि़ ३१ ऑगस्ट २०११ रोजी ईद सणा दरम्यान नेवासा शहरात जातीय दंगल घडली होती. त्यावेळी हलीमाबी युसूफ पटेल यांचे गंगानगर भागातील घर जाळण्यात आले होते. घर जळाल्याची फिर्याद हलीमाबी पटेल यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर याच आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याचा राग धरून १३ सप्टेंबर २०११ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या दरम्यान नेवासा शहरालगतच्या खुपटी रोड वर असिफ युसुफ पटेल (वय ३८) यांच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. अशा आशयाची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाली होती़ घटनेनंतर सोपान ऊर्फ सोप्या भगवान गाढे (२२), धनू ऊर्फ धनंजय ऊर्फ गोविंद अशोक काळे (२२), बिट्टू ऊर्फ अनिल चिमाजी लष्करे (३२), रवींद्र बबन काळे (२५), संतोष जगन्नाथ पंडुरे (३२), राजेंद्र कारभारी काळे (३४), आंबादास लक्ष्मण धोत्रे (२६), संजय लक्ष्मण सुकदान (३१) व सोन्या ऊर्फ सुनील मोहन परदेशी (३०) यांचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आठ आरोपी पोलिसांच्या ताब्यात होते तर सुनील परदेशी हा फरार होता.अपूर्ण़़़़़़़़़़़़