दफनभूमीच्या देखभालीसाठी महापालिकेचे अनुदान मोफत दफनविधी : पालिका महिन्याला ६० हजार रुपये देणार
By admin | Updated: March 14, 2015 23:45 IST
नवी मुंबई : महापालिकेच्यावतीने सर्व स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यविधी करण्यात येतात. त्याचप्रमाणे दफनभूमीमध्येही देखभालीसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक दफनभूमीसाठी महिन्याला ६० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
दफनभूमीच्या देखभालीसाठी महापालिकेचे अनुदान मोफत दफनविधी : पालिका महिन्याला ६० हजार रुपये देणार
नवी मुंबई : महापालिकेच्यावतीने सर्व स्मशानभूमीमध्ये मोफत अंत्यविधी करण्यात येतात. त्याचप्रमाणे दफनभूमीमध्येही देखभालीसाठी अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक दफनभूमीसाठी महिन्याला ६० हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने जवळपास २००७ पासून मोफत अंत्यविधी करण्याचे धोरण सुरू केले आहे. शहरातील सर्व स्मशानभूमीमध्ये अग्निसंस्कारासाठी लागणारी लाकडे व इतर वस्तू पालिकेच्यावतीने पुरविण्यात येत आहेत. याच धर्तीवर दफनभूमीच्या देखभालीसाठीसुद्धा मदत मिळावी यासाठी अनेक संस्थांनी व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा सुरू केला होता. महापालिकेने याविषयी प्रस्ताव नुकताच सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर केला आहे. दफनभूमीमध्ये दैनंदिन साफसफाई, देखभाल, निगा, परिचलन, सुरक्षारक्षक, दफनविधीकरिता आवश्यक दोन व्यक्तींची व्यवस्था करण्याकरिता प्रत्येक महिन्याला ६० हजार रुपये अनुदान सुरू केले आहे. शहरातील आठ संस्थांना महापौर सागर नाईक, उपमहापौर अशोक गावडे यांच्या हस्ते अनुदानाचा धनादेश देण्यात आला. मदत करण्यात आलेल्यांमध्ये शराना संकुल, ऐरोली मस्जीद इ अक्सा ट्रस्ट, ऐरोली ख्रिश्चन वेल्फेअर असोसिएशन, अंजुमन खैरूल इस्लाम ट्रस्ट, दाऊदी बोहरा जमात, नुरूल इस्लाम ट्रस्ट, शराना संकुल वाशी, दशनाम गोसावी समाज या संस्थांचा समावेश आहे. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय पत्तीवार, मुख्यालय उपआयुक्त जगन्नाथ सिन्नरकर, सलीमभाई व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)फोटो आहे.