मुंडे देणार शहर राष्ट्रवादीला बुस्ट!
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख: कार्यक र्त्यांत उत्साहनागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नावांची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या स्वरूपात जिल्ह्याला तरुण व तडफदार नेतृत्व मिळाल्याने ...
मुंडे देणार शहर राष्ट्रवादीला बुस्ट!
जिल्ह्याचे नवे संपर्क प्रमुख: कार्यक र्त्यांत उत्साहनागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभारी जिल्हा संपर्क प्रमुखांच्या नावांची बुधवारी घोषणा करण्यात आली आहे. यात नागपूर जिल्ह्याची जबाबदारी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांच्या स्वरूपात जिल्ह्याला तरुण व तडफदार नेतृत्व मिळाल्याने पक्ष कार्यक र्त्यांत उत्साह संचारला आहे. त्यांच्या निवडीने शहर व जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस बळकट होईल, असा विश्वास पक्षाचे शहर अध्यक्ष अजय पाटील यांनी व्यक्त केला.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जाहीर केलेल्या संपर्क प्रमुखांच्या यादीत नागपूर व वर्धा जिल्ह्याची जबाबदारी मुंडे यांच्यावर सोपविली आहे. ते स्पष्टवक्ते असल्याने त्यांचा प्रशासनावर वचक राहील. मुख्यमंत्र्यांच्या गृह जिल्ह्याची जबाबदारी विरोधी पक्षनेत्यांवर सोपविल्याने पक्ष संघटना बांधणीसाठी मदत होईल. आगामी महापालिका निवडणुकीत आम्हाला याचा लाभ होईल. असेही ते म्हणाले.दोन वर्षांनी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. मुंडे यांच्यासारख्या तडफदार नेत्याचा या निवडणुकीत पक्षाला लाभ होईल,असे ते म्हणाले.(प्रतिनिधी)