शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

आजपासून धावणार मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस, पाहा वेळापत्रक आणि तिकीट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 07:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उद्घाटन.

मुंबई : बहुप्रतीक्षित आणि नव्याने बनवलेली सेमी-हाय स्पीड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस आज, ३० सप्टेंबरपासून धावणार आहे. मुंबई ते अहमदाबाददरम्यान धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या ट्रेनची नियमित सेवा १ ऑक्टोबर २०२२ पासून मुंबई सेंट्रल येथून सुरू होणार आहे. 

वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यात येणार आहेत. ही पूर्णपणे एसी असणार आहे. त्यासोबतच स्लाइडिंग दरवाजे, व्यक्तिगत वाचनासाठी दिवा, मोबाइल चार्जिंग पॉइंट, अटेंडेंट कॉल बटन, बायो-टॉयलेट, स्वंचलित  द्वार, सीसीटीव्ही कॅमेरे, रिक्लाइनिंग सुविधा, आरामदायक सीट असणार आहेत.  नुकतीच रेल्वे मंत्रालयाने मुंबई ते अहमदाबाद दरम्यान वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस चालविण्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई सेंट्रल ते गांधीनगर दरम्यान ही गाडी रविवार सोडून दररोज धावणार आहे. पंतप्रधान मोदी शुक्रवारी  सकाळी १०. ३० वाजता गांधीनगर येथून वंदे भारतच्या पहिल्या फेरीला हिरवा झेंडा दाखवणार आहे. प्रवाशांसाठी वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेस  अहमदाबाद  स्थानकावरून सकाळी १४. ०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १९.३५ वाजता पोहोचेल.

वेळापत्रकमुंबई सेंट्रल येथून सकाळी ६.२० वाजता सुटेल आणि दुपारी १२.३० वाजता गांधीनगरला पोहोचेल.  गांधीनगर येथून दुपारी १४.०५ वाजता सुटेल रात्री १९.३५ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचेल.  सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या दिवशी ही गाडी धावणार आहे.

तिकीट दर  चेअर कार तात्पुरते भाडे (केटरिंग शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत- ६९० रुपये,  मुंबई सेंट्रल ते वडोदरा- ९०० रुपये,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद - १०६० रुपये,  मुंबई सेंट्रल ते गांधीनगर -१११५ रुपये तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी तात्पुरते भाडे (खानपान शुल्क वगळून) मुंबई सेंट्रल ते सुरत-१३८५ रुपये , मुंबई सेंट्रल ते वडोदरा - १८०५  रुपये ,  मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद-२१२० रुपये, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर- २२६० रुपये असणार आहे.

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसMumbaiमुंबईahmedabadअहमदाबाद