शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Mumbai- Ahmedabad Bullet Train: पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वप्न साकार होणार; देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 18:14 IST

बिलिमोरा हे दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आहे. सध्या या मार्गावर वेगाने काम सुरू आहे.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं(PM Narendra Modi) ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या बुलेट ट्रेनबाबत महत्त्वाची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. देशातील पहिली बुलेट ट्रेन मुंबईहून अहमदाबादपर्यंत धावणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून या बुलेट ट्रेनची चर्चा लोकांमध्ये आहेत. परंतु याबाबत काहीच स्पष्ट नाही. मात्र आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुजरातच्या सूरतहून बिलीमोरा येथे पहिली बुलेट ट्रेन २०२६ मध्ये सुरू होईल अशी आशा व्यक्त केली आहे. 

बिलिमोरा हे दक्षिण गुजरातच्या नवसारी जिल्ह्यात आहे. सध्या या मार्गावर वेगाने काम सुरू आहे. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी रेल्वेमंत्री सुरत येथे होते. त्यावेळी ते म्हणाले की, अहमदाबाद ते मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन धावण्यासाठी पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. २०२६ मध्ये सुरत ते बिलीमोरा दरम्यान पहिली बुलेट ट्रेन चालवण्याचे आमचे ध्येय आहे. त्याची प्रगती चांगली आहे आणि आम्हाला आशा आहे की आम्ही हे लक्ष्य साध्य करू शकू असं त्यांनी म्हटलं आहे.  

मुंबई ते अहमदाबाद दरम्यान ताशी ३२० किमी वेगाने बुलेट ट्रेन चालवण्याचा प्रस्ताव आहे. दोन शहरांमधील एकूण अंतर ५०८ किमी आहे आणि त्यात १२ स्थानके असतील. या ट्रेनमुळे दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ अवघा ३ तास होणार आहे. सध्या या प्रवासासाठी सहा तास लागतात. या प्रकल्पाची एकूण अंदाजे किंमत १.१ लाख कोटी रुपये आहे. त्यापैकी ८१ टक्के निधी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (JICA) कडून दिला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या ६१ किमीच्या मार्गावर खांब उभारण्यात आले असून १५० किमीच्या मार्गावर काम सुरू असल्याचा दावा वैष्णव यांनी केला. 

महाराष्ट्रात लागला ब्रेकगुजरातमध्ये बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर असलं तरी  महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाबद्दल विचारले असता, भूसंपादनाच्या समस्येमुळे तेथे काम संथगतीने सुरू असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. महाराष्ट्र सरकारने सहकार्याच्या भावनेने या प्रकल्पात काम करावे, हा राष्ट्रीय प्रकल्प असून त्यात कोणतेही राजकारण नसावे. आपण या प्रकल्पावर एकत्र काम करून एक उदाहरण ठेवले पाहिजे, महाराष्ट्र विभागात त्याची प्रगती संथ आहे. तेथे कामाला गती येईल, अशी आशा आहे असं रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. 

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदी