शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मुखर्जी दाम्पत्यामुळे पी. चिदम्बरम यांची चौकशी; आयएनएक्स मीडियाने उभारले ४.६२ ऐवजी ३०५ कोटींचे भांडवल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 02:13 IST

इंद्राणी मुखर्जीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचे २०१४ मध्ये उघड झाल्याने तिला अटक झाली. पीटरचाही खुनात सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक झाली.

- सोपान पांढरीपांडेनागपूर : सीबीआय आणि ईडीला पीटर व इंद्राणी मुखर्जी या दाम्पत्याने दिलेल्या जबाबामुळे माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम व त्यांचे पुत्र कार्ती अडचणीत आले आहेत. आयएनएक्स मीडिया प्रकरण आयएनएक्स मीडिया ही पीटर व इंद्राणी मुखर्जी यांची कंपनी असून ती टीव्ही चॅनल्सचे संचालन करण्यासाठी २००६ मध्ये स्थापन करण्यात आली होती. या कंपनीने २००७ मध्ये मॉरिशसच्या तीन कंपन्यांकडून विदेशी भांडवल उभारण्यासाठी फॉरेन एक्स्चेंज प्रमोशन बोर्डाला परवानगी मागितली. तसेच आयएनएक्स न्यूज या सहयोगी कंपनीलाही विदेशी भांडवलाची परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती.दोनच महिन्यांत एफआयपीबीने आयएनएक्स मीडियाला ४.६२ कोटी विदेशी भांडवल आणण्याची परवानगी दिली. परंतु आयएनएक्स न्यूजचा अर्ज नामंजूर केला. या परवानगीचा दुरुपयोग करून, आयएनएक्स मीडियाने ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी रुपयांचे भांडवल मॉरिशसमधून आयएनएक्स व आयएनएक्स न्यूज या कंपन्यांमध्ये आणले. यासाठी आयएनएक्सने आॅगस्ट २००७ ते मे २००८ या काळात आपला १० रुपयांचा शेअर ८१० रुपयांना मॉरिशसच्या कंपन्यांना विकला, असे प्राप्तिकर खात्याच्या चौकशीत समोर आले आहे.इंद्राणी मुखर्जीने पहिल्या पतीपासून झालेली मुलगी शीना बोरा हिचा खून केल्याचे २०१४ मध्ये उघड झाल्याने तिला अटक झाली. पीटरचाही खुनात सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यालाही अटक झाली. गेल्या चार वर्षांपासून मुखर्जी दाम्पत्य जेलमध्ये आहे.या प्रकरणात ईडी व सीबीआयने चौकशी केली असता पीटर व इंद्राणी मुखर्जी यांचेही जबाब २०१८ मध्ये नोंदविण्यात आले.आयएनएक्स मीडियाने ४.६२ कोटींऐवजी ३०५ कोटी विदेशी भांडवल उभारल्याचे त्या दोघांनी मान्य केले. हा गैरप्रकार नियमित करण्यासाठी आपण कार्ती यांच्याशी १० लाख डॉलर्स देण्याचा सौदा केला आणि त्यापैकी ७ लाख डॉलर्स अ‍ॅडव्हान्टेज स्ट्रॅटेजिक कन्स्लटंटच्या विदेशी उपकंपन्याना दिले, असा जबाब दिला.या जबाबावरून ईडीने आयएनएक्स मीडिया प्रकरणात मे २०१७ मध्ये पीटर व इंद्राणी मुखर्जी आणि चिदम्बरम व कार्ती यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला. मग सीबीआयनेही त्यांच्या विशेष कोर्टात २०१७ मध्ये एफआयआर दाखल केला. या प्रकरणात इंद्राणी मुखर्जीने माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. चिदम्बरम व कार्ती या पिता-पुत्रांनी हे आरोप नाकारले आहेत, हे विशेष. चिदम्बरम यांना बुधवारी अटक झाल्यानंतर आता कार्ती यांचा जामीन रद्द होतो काय याबद्दल औत्सुक्य आहे.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरम