शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

मुकेश अंबानी भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती, फोर्ब्जनं केलं जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:26 IST

फोर्ब्ज मॅगझिननं भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे.

नवी दिल्ली - फोर्ब्ज मॅगझिननं भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी या यादीत पहिला क्रमांक पटकावला आहे. फोर्ब्जनं भारतातल्या 100 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केलीय. या यादीमध्ये दुस-या क्रमांकावर अझीम प्रेमजी, हिंदुजा बंधू तिसऱ्या तर गौतम अदानी दहाव्या स्थानावर आहेत.मुकेश अंबानी 38 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह प्रथम क्रमांकावर झेपावले आहेत, तर अझीम प्रेमजी 19 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह दुस-या स्थानी आहे. हिंदुजा बंधू यांची 18.4 अब्ज डॉलरची संपत्ती असल्यानं त्यांना यादीत तिसरं स्थान बहाल करण्यात आलं आहे. तर लक्ष्मी मित्तल हे 16.5 अब्ज डॉलरसह चौथ्या स्थानी विराजमान झाले आहेत. पालोनजी मिस्त्री 16 अब्ज डॉलर, तर गोदरेज कुटुंबीय 14.2 अब्ज डॉलरसह अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत, शिव नाडर हे 13.6 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह सातव्या स्थानी आहेत. कुमार बिर्ला 12.6 अब्ज डॉलर, दिलीप संघवी 12.1 अब्ज डॉलर, गौतम अदानी 11 अब्ज डॉलरसह आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानी आहेत.

गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराविरुद्ध प्रचार करून, केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांना देशातील भ्रष्टाचार संपविण्यात यश आलेले नाही, असेच फोर्ब्ज मासिकाने प्रसिद्ध झालेल्या वृत्तामुळे स्पष्ट झाले होते. या मासिकातील वृत्तानुसार भारतात आजही प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि अन्य शेजारी राष्ट्रांपेक्षा भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारत खूपच पुढे असल्याचंही फोर्ब्जनं समोर आणून दिलं होतं.या मासिकाने भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे म्हटले होते. ट्रान्सफरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे फोर्ब्जने हा निष्कर्ष काढला आहे. पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशपेक्षाही भारतात अधिक भ्रष्टाचार आहे, असे अहवालातून स्पष्ट झालं आहे. भारतामध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे, असे अहवालामध्ये नमूद करण्यात आले होते.आशिया खंडामध्ये भ्रष्टाचाराची समस्या खूपच भयानक असून, थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान, म्यानमार व भारत या पाच देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण खूपच अधिक आहे, असा निष्कर्ष सर्वेक्षणाच्या आधारे काढण्यात आला आहे. या पाच भ्रष्ट देशांमध्ये भारताचा क्रमांक पहिला असून, त्या खालोखाल व्हिएतनाम (६५ टक्के), थायलंड व पाकिस्तान यांचा क्रमांक लागतो, असे या अहवालातून दिसते.पाकिस्तानात भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा २0 टक्के कमी म्हणजेच, ४० टक्के आहे, असे हा अहवाल म्हणतो. सत्तेवर आल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दूंगा,’ अशी घोषणा दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकणार नाही, पण त्यांची ‘न खाने दूंगा’ ही घोषणा मात्र प्रत्यक्षात आलेली नाही, असेच अहवालातील निष्कर्षांमुळे म्हणावे लागेल. प्रशासनातील, तसेच राजकारणातील भ्रष्टाचार आजही संपलेला नाही वा कमी झालेला नाही, असाच याचा अर्थ आहे. हा सर्व्हे तब्बल १८ महिने सुरू होता. त्यात आशिया खंडातील १६ देशांमधील विविध विभागांत राहणा-या लोकांना प्रश्न विचारण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरोधात चालविलेल्या प्रयत्नांबद्दल ५३ टक्के लोकांनी या सर्व्हेमध्ये समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानी