शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अकबर आणि महान सम्राट..., छे छे, काहीतरीच काय?; महाराणा प्रताप हेच श्रेष्ठ- योगी आदित्यनाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 8:54 AM

सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत.

लखनऊ: अकबराला महान सम्राट वैगैरे म्हणणे ही अतिशयोक्ती ठरेल. महाराणा प्रताप हेच 16 व्या शतकातील महान सम्राट होते, असे विधान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते गुरुवारी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी महाराणा प्रताप यांची प्रशंसा करताना म्हटले की, 1576 साली हळदीघाट येथील लढाईत कोण जिंकले किंवा हरले, हे महत्त्वाचे नाही. याउलट स्वाभिमानी महाराणा प्रताप यांनी अरवलीच्या पर्वतरांगांमध्ये अनेक वर्षे अकबराच्या सैन्याशी लढा दिला. चिकाटीने लढून सर्व किल्ले परत मिळवले. तुम्ही माझे सम्राटपद मान्य करा, मी कधीच मेवाडमध्ये फिरकणार नाही, असा प्रस्ताव अकबराने महाराणा प्रतापांसमोर ठेवला होता. जयपूरच्या महाराज मानसिंग यांनीदेखील त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महाराणा प्रतापांनी अकबराचे सम्राटपद कधीच मान्य केले नाही. मी तुर्कांवर कधीच विश्वास ठेवणार नाही, असे त्यांनी अकबराला ठणकावून सांगितल्याचा इतिहास योगींनी उपस्थितांसमोर मांडला. त्याकाळी अनेक राजांनी आपला स्वाभिमान गहाण टाकून अकबराचे सम्राटपद मान्य केले. मात्र, महाराणा प्रताप त्याला अपवाद ठरले. त्यांचे हे विचार आजच्या काळातही लागू पडतात. सध्या काही लोक वैयक्तिक स्वार्थापायी स्वत:चा समाज, संस्कृती आणि देशातील वातावरण गढूळ करायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सर्वांचे नुकसान होत आहे. यावेळी योगी आदित्यनाथांनी अनुसूचित जाती-जमाती आणि मागासवर्गीयांना आवाहन केले की, तुम्ही स्वत:ला महाराणा प्रतापांचे वंशज समजा. याच सर्व लोकांच्या पाठिंब्यामुळे महाराणा प्रताप इतके महान राजे ठरले. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्यांनी अकबराच्या सैन्याशी लढा दिला आणि ते शेवटपर्यंत शत्रूच्या हाताला लागले नाहीत, असे योगींनी सांगितले. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथ