वडार ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदी मुधोळकर
By admin | Updated: August 22, 2015 00:43 IST
सोलापूर : वडार ज्ञाती संस्था सोलापूरच्या अध्यक्षपदी मनोहर शंकरराव मुधोळकर यांची निवड करण्यात आली आहे.
वडार ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदी मुधोळकर
सोलापूर : वडार ज्ञाती संस्था सोलापूरच्या अध्यक्षपदी मनोहर शंकरराव मुधोळकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या सर्वसाधारण सभेत ही निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवड करण्यात आलेल्या पदाधिकार्यांची नावे पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष- राम निंबाळकर, सचिव- राजू चौगुले, सहसचिव- गोपीचंद मुदगल, खजिनदार- तात्याबा घोडके असे पदाधिकारी आहेत. सालाबादप्रमाणे यंदाही वर्षभरात वधू-वर मेळावे, सामुदायिक विवाह सोहळा, हनुमान जयंती साजरी करणे, समाजातील 10 वी, 12 वी व पदवीधर व अन्य क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार होणार आहे. दि.30 ऑगस्ट 2015 रोजी अशोक चौक येथील र्शी व्यंकटेश्वर मंदिर येथे सकाळी 11 वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन माजी अध्यक्ष शंकर मंजेली, शंकर चौगुले, आप्पाराव विटेकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)