शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एमटीएनएलचे जानेवारीचे बहुप्रतिक्षीत वेतन गुरुवारी 21 फेब्रुवारीला होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2019 15:19 IST

- खलील गिरकर    मुंबई - महानगर टेलिफोन निगम लिमिटेड ( एमटीएनएल )  च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे ...

- खलील गिरकर  मुंबई - महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (एमटीएनएल)  च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जानेवारी महिन्याचे वेतन अखेर गुरुवारी 21 फेब्रुवारी रोजी होणार आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु होत आला तरी जानेवारी महिन्याचे वेतन झालेले नसल्याने एमटीएमएल कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये संताप पसरला होता. नेमके कधी वेतन होणार याबाबत अनिश्चितता होती मात्र आता 21 फेब्रुवारीला वेतन होणार असल्याचे निश्चित झाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.  गेल्या काही महिन्यात एमटीएनएलला वेतनासाठी बँकांकडे हात पसरण्याची वेळ आली होती. बँकांकडून कर्ज घेऊन वेतन दिले जात होते. मात्र एमटीएनएल वरील कर्जाचा बोझा सुमारे वीस हजार कोटी पर्यंत पोचल्याने आता बँकांनी हात वर केले व कर्ज देण्यास नकार दिल्याने वेतन रखडले होते. मुंबई व दिल्ली मध्ये एमटीएनएलचे सुमारे तेवीस हजार कर्मचारी व अधिकारी असून त्यांच्या वेतनासाठी सुमारे एकशे साठ कोटी रुपयांची दरमहिन्याला गरज भासते. एमटीएनएलच सरकारकडील काही प्रलंबित देणी मिळाल्याने हे वेतन काढणे शक्य झाल्याची माहिती एमटीएनएलच्या अधिकाऱ्यांनी दिली. 21फेब्रुवारीला दिल्लीत डिजिटल कम्युनिकेशन कमिशन ची बैठक होणार आहे त्यामध्ये  एमटीएनएलची पुनर्रचना करण्याचा मुख्य मुद्दा आहे. त्यावर चर्चा होईल व त्यामध्ये ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.  कोट वेतन वेळेवर होत नसल्याने एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना प्रचंड आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या महत्त्वपूर्ण प्रश्नावर कायमस्वरुपी मार्ग काढण्याची गरज आहे. सरकारने गाभीर्याने याकडे लक्ष देऊन हा अन्याय दूर करण्याची आवश्यकता आहे. दिलीप जाधव, सरचिटणीस, महानगर टेलिफोन निगम कामगार संघटना

टॅग्स :MTNLएमटीएनएलMumbaiमुंबई