शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

श्री स्वामीनारायण शिक्षापत्रीचा ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 12:15 IST

वडताळघाममध्ये राहून भगवान श्री स्वामीनारायणांनी १९६ वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत २१२ श्लोकांची रचना केली. सध्या संस्कृतसह हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमध्ये ही शिक्षापत्री उपलब्ध आहे.

मुंबई : जगातील सर्वात मोठा हस्तलिखित ग्रंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भगवान श्री स्वामीनारायणांच्या शिक्षापत्रीचा समावेश गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि ऑल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाला आहे. या ग्रंथाचे वजन १२० किलो इतके असून, तो ८ फूट रुंद आणि ५.५ फूट उंच आहे. गुजरातचे परमपूज्य श्री ज्ञानजीवनदासजी स्वामी कुंडलधाम यांच्या प्रेरणेने तयार केलेली ही शिक्षापत्री वडताळघाम येथे १० एप्रिलला समर्पित करण्यात आली.वडताळघाममध्ये राहून भगवान श्री स्वामीनारायणांनी १९६ वर्षांपूर्वी संस्कृत भाषेत २१२ श्लोकांची रचना केली. सध्या संस्कृतसह हिंदी, गुजराती आणि इंग्रजी या भाषांमध्ये ही शिक्षापत्री उपलब्ध आहे. परमपूज्य श्री ज्ञानजीवनदासजी स्वामी यांच्या प्रेरणेने ही शिक्षापत्री तयार करण्यात आली आहे. मानवजाती आणि भक्तांच्या कल्याणासाठी श्री स्वामीनारायण यांचे आशीर्वाद आणि आज्ञा पोहोचवण्याच्या उद्देशाने हे ग्रंथ समर्पण पार पडले.२४ तासांत ग्रंथ तयार- श्री स्वामीनारायण भगवान यांनी १९६ वर्षांपूर्वी ही शिक्षापत्री स्वत: वडताळमध्ये राहून लिहिली होती. - या चित्ररूपी शिक्षापत्रीमध्ये २१२ श्लोक आहेत. २२४ हस्तलिखिते आणि चित्रलेखांचा समावेश या ग्रंथात आढळतो. - महत्त्वाची बाब म्हणजे कुंडलधामच्या १५० हरिभक्तांनी केवळ २४ तासांमध्ये हा ग्रंथ तयार केला आहे. - तर १० तासांमध्ये ग्रंथ बांधणीचे कार्य करण्यात आले. संपूर्ण पुस्तकात कुठेही छपाई यंत्राचा उपयोग केला नाही. 

टॅग्स :guinness book of world recordगिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड