शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

श्री. श्री. रवीशंकरांवरील जोकमुळे टिवंकल खन्ना वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: May 9, 2016 13:19 IST

श्री श्री रवीशंकर यांची टिवंकल खन्नानं ट्विटरवर खिल्ली उडवली असून त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॉलोअर्सनी तुफान टीका केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - श्री श्री रवीशंकर यांची टि्वंकल खन्नानं ट्विटरवर खिल्ली उडवली असून त्यामुळे तिच्यावर सोशल मीडियावर आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॉलोअर्सनी तुफान टीका केली आहे. अखेर टि्वंकलनं ते वादग्रस्त ट्विट डिली केलं आहे. अर्थात, तिच्या बाजुनेही अनेक नेटकरांनी मतं नोंदवली असून आर्ट ऑफ लिव्हिंगच्या फॉलोअर्सच्या दबावापुढे झुकण्याची गरज नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केलं आहे.
मलाला युसुफजाईला मिळालेल्या नोबेलवरून श्री श्री रवीशंकर यांनी टीका केली होती, आणि आपल्याला नोबेल दिलं तरी आपण स्वीकारणार नाही असं म्हटलं होतं. यासंदर्भात टि्वंकलनं पुढील टि्वट केलं होतं.
 
"Sri Sri got his nobel foot and half beard stuck in his mouth in a yogic pose that baba Ramdev perfected a while ago"
 
मात्र सदर टि्वट तिनं नंतर काढलं. दरम्यान, रवीशंकर यांच्या काही भक्तांनी अक्षयकुमारच्या हाऊसफूल 3 या चित्रपटावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे लाखो भक्त बॉयकॉट घालतिल असं म्हटलं. यावर टि्वंकलनं माझ्या जोकसंदर्भात माझ्या पतीला व त्याच्या सिनेमाला मध्ये आणण्याचं काय कारण असं म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.
सध्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे टि्वंकलच्या बाजुने तर कट्टर आर्ट ऑफ लिव्हिंगवाले तिच्या विरोधात असं वाकयुद्ध सोशल मीडियावर रंगलेलं बघायला मिळतआहे.