शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

"संध्याकाळ होताच गोळीबार सुरू होतो, राष्ट्रपती राजवटीची गरज", मणिपूरहून परतले 'इंडिया'चे खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:30 IST

दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये 3 मे रोजी सुरू झालेला हिंसाचार आतापर्यंत सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांची आघाडी असलेल्या 'इंडिया'च्या २१ खासदारांचा मणिपूर दौरा केला होता. आज या खासदारांचा मणिपूर दौरा आज संपला. दौऱ्याच्या शेवटच्या दिवशी रविवारी इंफाळमध्ये मणिपूरच्या राज्यपाल अनुसुईया उईके यांची भेट घेऊन सर्व खासदार दिल्लीला परतले आहेत.

दिल्लीत पोहोचलेल्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सांगितले की, मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि दोन (कुकी आणि मैतेई) समुदायांमध्ये अजूनही तणाव आहे. तसेच, राज्यातील अनेक भागात संध्याकाळ होताच गोळीबाराचे आवाज येऊ लागतात, असा दावा खासदारांनी केला. सर्व विरोधी खासदारांनी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

सध्या राज्यात राष्ट्रपती राजवटीची गरज असल्याने बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, असे खासदारांनी सांगितले. तसेच, परिस्थिती इतकी बिकट आहे की राज्याचे राज्यपालही हतबल होऊन काहीही करू शकत नाहीत. मणिपूरमधील परिस्थिती अत्यंत गंभीर असूनही केंद्र सरकार शांत बसले आहे, असा आरोप सुद्धा खासदारांनी केला आहे.

मणिपूर दौऱ्यात विरोधी खासदारांच्या टीममध्ये सहभागी असलेले काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राज्यातील परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचे म्हटले आहे. अधीर रंजन चौधरी म्हणाले की, संपूर्ण मणिपूर जळत आहे आणि देशाचे पंतप्रधान बासरी वाजवत आहेत. मोठमोठ्या चर्चा होत आहेत, पण मणिपूरबाबत मौन आहे. सरकार डोळे मिटून बसले आहे, तातडीने ठोस पावले उचलली नाहीत तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. 

मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी - मनोज झायाचबरोबर, आरजेडीचे खासदार मनोज झा म्हणाले की, मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, अशी आमची इच्छा आहे. दोन्ही समुदायाने राज्यात सामंजस्याने राहावे, एवढीच आमची मागणी आहे. तेथील परिस्थिती अधिक धोकादायक आहे. यावर सर्वतोपरी समर्थन केले जाईल, अशी चर्चा यापूर्वीच संसदेत झाली आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने मणिपूरलाही भेट द्यावी, असे त्यांनी म्हटले आहे.

आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू मणिपूरमध्ये ३ मे रोजी कुकी समुदायाकडून आदिवासी एकता रॅली काढण्यात आली होती. या रॅलीदरम्यान कुकी आणि मेईतेई समुदाय आमनेसामने आले आणि काही वेळातच हाणामारीचे रूपांतर हिंसाचारात झाले. राज्याच्या विविध भागात हजारो घरे आणि दुकाने जाळण्यात आली. या हिंसक संघर्षात आतापर्यंत १५० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो लोकांना मदत छावण्यांमध्ये राहावे लागले आहे. मात्र, राज्यात शांतता राखण्यासाठी सरकारकडून लष्करही तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचार