शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

निधी खर्च करण्यात महाराष्ट्र, कर्नाटकचे खासदार अव्वल; एवढा मिळतो निधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 07:40 IST

उत्तर प्रदेश, केरळ पिछाडीवर; प्रत्येक खासदाराला मिळतो ५ कोटींचा निधी

हरिश गुप्तानवी दिल्ली : कर्नाटक व महाराष्ट्रातील खासदार मागील तीन वर्षांत खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधी वापरण्यात इतर राज्यांतील खासदारांपेक्षा कितीतरी पुढे आहेत. लोकसभा (५४५) व राज्यसभेच्या (२४५) प्रत्येक खासदाराला दरवर्षी त्यांच्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मिळतो. स्थानिक क्षेत्र विकास निधी योजना १९९३-९४ मध्ये सुरू करण्यात आली होती व तेव्हा प्रत्येक खासदाराला ५ लाख रुपये मिळत असत. २०१२-१३ मध्ये हा निधी ५ कोटी रुपये करण्यात आला.

विविध अधिकृत सूत्रांकडून एकत्रित केलेल्या माहितीनुसार, संसदेच्या दोन्ही सभागृहांतील कर्नाटकच्या ४० खासदारांनी त्यांना दिलेल्या निधीपैकी ९१.८३ टक्के निधी खर्च केला तर महाराष्ट्रातील ६७ खासदारांनी ८९ टक्के निधी खर्च केला. गुजरातच्या खासदारांनी ८२ टक्के निधी खर्च केला. डाव्या पक्षांची सत्ता असलेल्या केरळमधील २९ खासदारांनी केवळ ६२ टक्के निधी खर्च केला. तथापि, पश्चिम बंगालच्या खासदारांनी ७५ टक्के निधी खर्च केला. मिळालेल्या माहितीनुसार, ३७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश व नामनिर्देशित खासदारांना मागील तीन वर्षांत ७ हजार ५९५ कोटींचा निधी मिळाला. त्यापैकी ६ हजार१५० कोटी रूपये खर्च झाले व हे प्रमाण ८० टक्के आहे. निधी खर्चामध्ये बहुतांश राज्ये राष्ट्रीय सरासरीच्या खूप खाली आहेत. 

गोवाही आघाडीवर : विशेष म्हणजे गोव्यासारख्या छोट्या राज्याने सर्वाधिक ९२ टक्के खर्च केला. गोव्याच्या खासदारांना ३२ कोटींचा निधी मिळाला व त्यांनी २९.४४ कोटी खर्च केले. केंद्र सरकारने २०१९-२०, २०२१-२२ आणि २०२२-२३ या कालावधीत निधी जारी केला. कोविड महामारीमुळे केंद्र सरकारने २०२०-२१ या कालावधीत निधी जारी केला नाही. खासदार थेट रक्कम खर्च करू शकत नाहीत. प्रत्येक राज्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात त्यासाठी राज्यस्तरीय नोडल विकास यंत्रणा स्थापन केलेली आहे.

राज्यांनी तीन वर्षांत खर्च केलेला निधीराज्य    जारी केलेला    खर्च केलेला    कामगिरी     निधी (कोटी)    निधी (कोटी)   (टक्के)कर्नाटक    ३७१.५    ३४१.१५    ९१.८३ महाराष्ट्र    ७१९.५    ६४५.१७    ८९ उत्तर प्रदेश    १०४१.५    ७६१.४    ७३ मध्य प्रदेश    ३८१.५    ३०२.५४    ७९ गुजरात    २७०    २२३.४७    ८२ प. बंगाल    ५१२    ३८४.७९    ७५ केरळ    ३५७    २२३.८    ६२ सर्व राज्ये    ७५९५    ६१५०    ८०

 

टॅग्स :Member of parliamentखासदारlok sabhaलोकसभा