शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

केंद्र सरकारचा निर्णय; खासदारांना भरघोस वेतनवाढ, आता किती वेतन मिळेल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 17:44 IST

MP Salary And Pension: केंद्र सरकारने खासदारांचे मासिक वेतन, दैनंदिन भत्ता आणि पेन्शन वाढवली आहे.

Parliament Session:केंद्र सरकारने सोमवारी (24 मार्च 2025) खासदारांच्या पगारात भरघोस वाढ जाहीर केली. आता खासदारांना 1 लाखाऐवजी 1.24 लाख रुपये वेतन मिळणार आहे. वेतनासोबतच सरकारने खासदारांच्या पेन्शन आणि भत्त्यांमध्येही वाढ केली आहे. खासदारांच्या दैनंदिन भत्त्यात 500 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच, दैनंदिन भत्ता आता 2000 रुपयांवरून 2500 रुपयांपर्यंत वाढला आहे. ही नवीन वेतन वाढ 1 एप्रिल 2023 पासून लागू असेल.

खासदारांच्या पगारात 5 वर्षांनंतर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ही पगारवाढ 1 एप्रिल 2023 पासूनच लागू होईल. या निर्णयापूर्वी खासदारांचे पेन्शन 25 हजार रुपये होते, ते आता 31 हजार रुपये करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे दोन किंवा तीन वेळा खासदार राहिलेल्यांचे अतिरिक्त पेन्शन 2000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आले आहे. हा बदल संसद सदस्यांच्या वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन अधिनियम, 1954 द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून करण्यात आला आहे, तर आयकर कायदा, 1961 मध्ये निर्दिष्ट केलेल्या महागाई निर्देशांकावर आधारित आहे. 

2018 मध्ये वेतन आणि भत्ते सुधारित करण्यात आलेसंसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदारांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2018 मध्ये खासदार आणि माजी खासदारांना मिळणाऱ्या वेतन आणि भत्त्यांमध्ये सुधारणा जाहीर करण्यात आल्या होत्या. 2018 मध्ये दुरुस्तीत जाहीर झालेल्या खासदारांसाठी मूळ वेतन 1,00,000 रुपये प्रति महिना होते. 2018 च्या दुरुस्तीनुसार खासदारांना त्यांची कार्यालये अद्ययावत ठेवण्यासाठी आणि त्यांच्या जिल्ह्यातील मतदारांशी संवाद साधण्यासाठी मतदारसंघ भत्ता म्हणून 70,000 रुपये मिळतात. याशिवाय त्यांना दरमहा 60,000 रुपये कार्यालय भत्ता आणि संसदेच्या अधिवेशनात 2,000 रुपये दैनिक भत्ता मिळतो. या भत्त्यांमध्येही आता वाढ करण्यात येणार आहे.

खासदारांना इतर कोणत्या सुविधा मिळतात?याशिवाय खासदारांना फोन आणि इंटरनेट वापरासाठी वार्षिक भत्ताही मिळतो. यासोबतच, खासदार आणि त्यांच्या कुटुंबासाठी दरवर्षी 34 मोफत देशांतर्गत उड्डाणे आणि कोणत्याही वेळी प्रथम श्रेणी ट्रेन प्रवासाची सुविधा मिळते. तसेच, खासदारांना 50,000 मोफत वीज युनिट आणि 4,000 किलोलिटर पाण्याचा वार्षिक लाभ देखील मिळतो. त्यांच्या राहण्याची व्यवस्थाही सरकार करते.

टॅग्स :Member of parliamentखासदारParliamentसंसदCentral Governmentकेंद्र सरकार