शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशचे गृहमंत्री म्हणतात, पॉर्नमुळे बलात्काराच्या घटना वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 08:54 IST

देशामध्ये बलात्काराच्या व लैंगिक शोषणाच्या घटना वाढण्यामागे पॉर्न साइट्स हे महत्त्वाचं कारण असल्याचं वक्तव्य मध्यप्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केलं आहे.

नवी दिल्ली- देशामध्ये बलात्काराच्या व लैंगिक शोषणाच्या घटना वाढण्यामागे पॉर्न साइट्स हे महत्त्वाचं कारण असल्याचं आम्हाला वाटतं, असं वक्तव्य मध्य प्रदेशचे गृहमंत्री भूपेंद्र सिंह यांनी केलं आहे. मंत्रालयाने केलेल्या सर्व्हेनुसार पॉर्नसाइट्स अगदी सहजपणे वापरता येतात, त्यामुळे बलात्काराचे गुन्हे घटना वाढत असल्याचं आढळून आलं, असाही दावाही त्यांनी केला आहे. मध्यप्रदेशमध्ये पॉर्नसाइट्सवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी आम्ही केंद्राला विचारणा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. आम्ही अशा 25 वेबसाइट्सची माहिती निवडल्या आहेत व त्यावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे, असं भूपेंद्र सिंह यांनी सांगितलं. देशात वाढत्या बलात्काराच्या घटनांवर लोकांनी तीव्र शब्दात टीका करत निषेध नोंदवला, लोकांच्या उद्रेकानंतर भूपेंद्र सिंह यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

 

इंदूरमध्ये गेल्या आठवड्यात एका सहा महिन्याच्या चिमुरडीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. त्या चिमुरडीच्या काकाने तिच्यावर बलात्कार केल्याचं समोर आलं. सुनिल भील (वय 21) असं आरोपीचं नाव असून पीडित मुलीला उचलून घेऊन जातानाचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं. पीडित चिमुरडीच्या आईशी भांडण झाल्याने त्याने मुलीचं अपहरण करून हे कृत्य केल्याचं समोर आलं. या घटनेमुळे सगळीकडूनच हळहळ व्यक्त केली गेली. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, 92 टक्के प्रकरणात, अल्पवयीन मुलींवर त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून बलात्कार होतात, असं धक्कादायक विधान त्यांनी केलं होतं. इंदूरच्या घटनेने मला मोठा धक्का बसला आहे. एखाद्या लहान मुलीबरोबर कुणी असं कृत्य कसं करू शकतं? याघटनेवर प्रशासनाने पावलं उचलत आरोपीला तात्काळ अटक केली आहे. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा होइल याकडे आम्ही लक्ष देऊ, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं होतं.