शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

चित्रपट एका दिवसात १२० कोटी कमवतात; मग कसली मंदी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 05:41 IST

रवीशंकर प्रसाद यांचे अजब तर्कट

मुंबई : जगभरातील वित्तीय संस्था आणि अर्थशास्त्री मंदीच्या सावटाबाबत चिंता व्यक्त करत असताना, भाजपचे मंत्री मात्र चित्रपटांच्या कमाईचा दाखला देत मंदी नसल्याचे छातीठोकपणे सांगत आहेत. २ आॅक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानेच या चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केल्याचा अजब दावा केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी शनिवारी केला.

नरिमन पॉइंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रवीशंकर प्रसाद यांनी अर्थव्यवस्थेतील मंदीचे आणि बेरोजगारीचे दावे पूर्णपणे फेटाळून लावले. २ आॅक्टोबरला तीन चित्रपट प्रदर्शित झाले. सिनेउद्योगाच्या एका जाणकाराने दिलेल्या आकडेवारीनुसार, या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानेच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,’ असे प्रसाद म्हणाले. यावेळी प्रदेश कोषाध्यक्ष शायना एनसी, प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण, गणेश हाके उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत असल्याने आर्थिक आघाडीवर काळजी करण्यासारखी स्थिती नाही. देशात या वर्षी १६.३ बिलियन डॉलर एवढी थेट विदेशी गुंतवणूक आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा थेट विदेशी गुंतवणुकीत २० टक्के वाढ झाली आहे.चलनवाढीचा दर नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. करदात्यांच्या संख्येत गेल्या पाच वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे, आयकर संकलनातही दुपटीने वाढ झाली आहे. जागतिक मंदीतही भारताची अर्थव्यवस्था ६ टक्क्यांपेक्षा अधिक गतीने वाढत आहे. मागील दोन वर्षांत कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये (ईपीएफ) अडीच कोटींनी वाढ झाली आहे. गेल्या चार वर्षांत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात साडेपाच लाख जणांना नोकऱ्या मिळाल्या, असे नॅसकॉमच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नव्या नोकºया निर्माण होत आहेत, म्हणूनच कामगार भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये वाढ होते आहे, असे प्रसाद यांनी सांगितले.

टॅग्स :Ravi Shankar Prasadरविशंकर प्रसाद