शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दंगलग्रस्त भागात जवानांचे संचलन

By admin | Updated: July 8, 2017 01:11 IST

पोलीस आणि निमलष्करी दलाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागात संचलन केले. २४ परगना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित

कोलकाता : पोलीस आणि निमलष्करी दलाने शुक्रवारी पश्चिम बंगालच्या दंगलग्रस्त भागात संचलन केले. २४ परगना जिल्ह्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे संचलन करण्यात आले. राज्य सरकारने सांगितले की, बदुरिया, स्वरूपनगर, देगंगा आणि बशीरहाट भागात परिस्थिती नियंत्रणात आहे. पण, काही भागांत गुरुवारी हिंसाचाराच्या किरकोळ घटना झाल्या होत्या, अशी माहितीही मिळत आहे. स्थानिक नागरिक आपल्या घरांमध्येच होते. तर, दुकाने, बाजारपेठा, विद्यालये बंद  होती. वाहतूक व्यवस्थाही  जवळपास ठप्पच होती.  मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनी सर्व राजकीय पक्षांना  आवाहन केले आहे की, कोणीही दंगलग्रस्त भागात जाऊ नये. तथापि, डावे पक्ष, काँग्रेस आणि भाजपाच्या नेत्यांनी या भागात जाण्याचा  प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी  त्यांना या भागात जाण्यापासून रोखले. (वृत्तसंस्था) भाजपा, डावे, काँग्रेसच्या नेत्यांना रोखले पश्चिम बंगालच्या उत्तर भागातील २४ परगना जिल्ह्यात जाणाऱ्या भाजपा, डावे आणि काँग्रेसच्या नेत्यांना शुक्रवारी रोखण्यात आले. येथे जातीय संघर्षानंतर परिस्थिती तणावपूर्ण आहे. डाव्या पक्षाचे नेते सुजान चक्रबर्ती यांनी सांगितले की, या भागात गेल्याने समस्या निर्माण होऊ शकते, असे कारण देत आम्हाला त्या भागात जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. दंगलग्रस्त भागातील लोकांना भेटण्यासाठी आम्ही जात होतो. पोलीस आणि तृणमूल काँग्रेसच्या विरोधात डावे पक्ष बरसात क्षेत्रात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अधीर चौधरी यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या एका पथकाला बारासातमध्ये रोखण्यात आले. रूपा गांगुलींना ताब्यात घेतले भाजपाच्या खासदार रूपा गांगुली यांच्या नेतृत्वात उत्तर २४ परगना जिल्ह्यात दंगलग्रस्त बदुरिया भागात जाणाऱ्या भाजपाच्या एका शिष्टमंडळाला पोलिसांनी माइकल नगरभागात अडविले. रूपा गांगुली यांच्यासह पक्षाच्या १९ नेत्यांना विमानतळाजवळून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. बदुरियाकडे जाण्यासाठी हे शिष्टमंडळ अडून बसल्याने त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आम्ही कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. फेसबुकवर एका तरुणाने सोमवारी एक आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर बदुरिया आणि परिसरात तणाव निर्माण झाला आहे. या तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. पण, जमावाने त्याच्या घरावर हल्ला केला आणि वाहनांना आगी लावल्या, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.