शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्तींमधील मतभेद मिटविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 03:28 IST

र ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर

नवी दिल्ली : चार ज्येष्ठतम न्यायाधीशांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतल्याने, उघड झालेले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमधील मतभेद दूर करण्यासाठी व त्यातून उद््भवलेली परिस्थिती निवळण्यासाठी रविवारी दिवसभर अनेक हालचाली झाल्या. या जाहीर वादानंतर सर्व न्यायाधीश सोमवारी प्रथमच पुन्हा न्यायालयांचे कामकाज सुरू करणार आहेत.बार कौन्सिल आॅफ इंडियाने घेतलेल्या निर्णयानुसार त्यांचे अध्यक्ष अ‍ॅड. मन्नकुमार मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील ७ सदस्यांच्या शिष्टमंडळाने शिष्टाईचे प्रयत्न सुरू केले. मतभेद उघड करणाºया ४ न्यायाधीशांखेरीज इतरही न्यायाधीशांना व सरन्यायाधीशांना भेटून या मंडळींनी मतभेद आपसात चर्चेने सोडविण्याचा आग्रह केला, असे समजते. लवकरच सर्व काही ठाकठीक होईल, असा विश्वास कौन्सिलला वाटतो. या घटनेकडे न्यायमूर्ती संस्थेत निर्माण झालेला पेचप्रसंग या दृष्टीने पाहात नाहीत, असेही कौन्सिलच्या शिष्टमंडळास जाणवले.सूत्रांनुसार, या शिष्टमंडळाने सर्वप्रथम ‘बंडखोरां’चे नेतृत्त्व करणाºया न्या. जस्ती चेलमेश्वर यांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाणून घेतली. न्या. रंजन गोगोई, न्या. मदन बी. लोकूर व न्या. कुरियन जोसेफ दिल्लीत परतल्यानंतर, रात्रीपर्यंत त्यांनाही भेटण्याची शिष्टमंडळाची योजना होती. याखेरीज शिष्टमंडळ न्या. आर. के. अगरवाल व न्या. अजय खानविलकर यांनाही भेटल्याचे समजते. सरतेशेवटी सरन्यायाधीश न्या. दीपक मिस्रा यांनाही भेटण्याचा ते प्रयत्न करणार होते.