शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

मिरी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी हालचाली

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव परिसरातील जिल्हा परिषदेच्या मिरी गटाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे.

अहमदनगर : जिल्हा तालीम संघ व कै़ पै़ छबू लांडगे प्रतिष्ठानच्यावतीने दि़ २५ ते २८ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात येणार्‍या महाराष्ट्र राज्य कुस्ती स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असून, क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे़ यावेळी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, अन्न व नागरी विकास मंत्री गिरीश बापट, गृहराज्यमंत्री राम शिंदे, राष्ट्रीय खेळाडू सुशीलकुमार आदी उपस्थित राहणार असल्याचे स्पर्धेचे आयोजक वैभव लांडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले़
केसरी किताबासाठी अंतिम लढत गादीवर होणार असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व तयारी करण्यात आली आहे़ राज्यभरातून येणारे मल्ल, पंच, कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी यांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे़ स्पर्धेचे मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हा क्रीडा संकुल येथे आखाड्याचे काम पूर्ण झाले असून, प्रमुख पाहुण्यांना बसण्यासाठी तीन व्यासपीठ उभारण्यात येत आहेत़ पे्रक्षकांना कुस्तीचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी मैदानावर सहा एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार आहे़ स्पर्धेदरम्यान कुठलाही वाद होऊ नये, यासाठी आयोजकांच्यावतीने सर्वोतोपरी खबरदारी घेतली जात असल्याचे लांडगे म्हणाले़ यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, ॲड़ अभिषेक भगत, विलास चव्हाण, अंजली वल्लाकटी आदी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
....
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील सहभागावरून पुणे येथील दोन संघात सुरू असलेला वाद तसेच नगर येथे २०१३ झालेल्या कुस्ती स्पर्धेतील वाद लक्षात घेता आयोजकांनी कडक सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन केले आहे़ स्पर्धेतील पदाधिकारी, मल्ल, पंच, स्वयंसेवक व पत्रकारांना ओळखपत्र देण्यात येणार आहेत़ प्रेक्षकांना मैदानात दोन प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात येणार आहे़
.....
संपूर्ण मैदानात सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत़ तसेच १०० स्वयंसेवक, ४० बाऊंसर्स, ३० सिक्युरिटी गार्डस् आणि १२५ पोलिसांचा ताफा स्पर्धेच्या ठिकाणी राहणार आहे़ स्पर्धेसाठी २४ तारखेलाच मल्ल येणार असल्याने त्या दिवसांपासूनच सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे़
.....
टीप-सदर बातमी नगरला हॅलो पानात घेतली आहे. इतर आवृत्तीसाठी पाठवित आहे.