शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भारत  आणि पाकिस्तानमधील चर्चेसाठी पडद्याआडून हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:39 IST

काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत.

नवी दिल्ली, दि. 3 - काश्मीरमधील अशांतता आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या दहशतवादी कारवाया यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा पूर्णपणे बंद झाली आहे. मात्र दोन्ही देशांमधील चर्चा पुन्हा सुरू करण्यासाठी पडद्याआडून हालचाली सुरू आहेत. यासंदर्भात पाकिस्तानकडून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने संकेत मिळत आहेत. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नफीस झकारिया यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय चर्चा बंद झाली असली तरी सामाजिक क्षेत्रातील मंडळी अनौपचारिकपणे एकमेकांशी संवाद साधत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देशातील प्रमुख व्यक्ती दुबईत भेटल्या होत्या त्यावेऴी दोन दिवसांच्या बैठकीमध्ये आपापल्या देशातील सरकारांना चर्चेसाठी तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त पदावरून निरोप घेणारे अब्दुल बासित यांनी सांगितले की, दोन्ही देशांतील सुरक्षा सल्लागार एकमेकांच्या संपर्कात आहेत. दोन्ही देशातील संवाद सुरू व्हावा यासाठी अजित डोवाल आणि नासिर खान जंजुआ हे संपर्क ठेवून असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नवाझ शरीफ यांचे निकटवर्तीय मानले जाणारे एक भारतीय उद्योगपती दुसऱ्या स्तरावर चर्चा करत असल्याचे वृत्तही प्रसारित झाले होते.   मात्र परराष्ट्र मंत्रालयातील सूत्रांनी या प्रकरणी बोलण्यास नकार दिला आहे. पण दोन्ही देशांमधील चर्चेसाठी योग्य वातावरण तयार करण्याची जबाबदारी पाकिस्तानवर आहे. तसेच पाकिस्तानही भारतासोबत लवकरात लवकर चर्चा सुरू करण्यासाठी इच्छुक आहे. नियंत्रण रेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्हीकडच्या डीजीएमओंमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे प्रमाण घटले आहे.   दरम्यान आज संसदेत बोलताना परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवाद थांबल्याशिवाय पाकिस्तानशी चर्चा होणार नसल्याचे सांगितले होते. "दहशतवाद रोखण्यासाठी अमेरिका आणि रशिया भारतासोबत उभे आहेत.  पाकिस्तानसोबत संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले पण दहशतवाद थांबवल्याशिवाय त्यांच्याशी चर्चा अशक्य आहे,"असे स्वराज म्हणाल्या.