शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
4
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
5
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
6
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
7
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
8
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
9
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
10
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
11
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
12
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
13
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
14
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
15
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
16
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
17
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
18
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
19
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
20
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय

धरमलेवाडीवर शोककळा

By admin | Updated: May 13, 2014 00:56 IST

पाच जणांच्या अपघाती मृत्यूने ग्रामस्थ सून्न : धक्का बसल्याने १५ जणांवर उपचार

पाच जणांच्या अपघाती मृत्यूने ग्रामस्थ सून्न : धक्का बसल्याने १५ जणांवर उपचारसोळांकूर/राधानगरी : मंदिराची वास्तुशांती आणि येथील तरुणाच्या लग्नाअगोदर पाच जणांच्या मृत्यूने ऐनी पैकी धरमलेवाडीवर शोककळा पसरली. गावातील आक्रोश, वेदना, चिमुकल्यांची भेदरलेली मुद्रा पाहून प्रत्यक्ष सांत्वनासाठी येणारेदेखील दु:खसागरात लोटल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. सारा गावच पै-पाहुण्यांचा, भाऊबंदकीचा कोणी कोणासाठी रडायचं हेच कोणाला कळेना. राधानगरी तालुक्यातील अत्यंत दुर्गम असणार्‍या ऐनी पैकी धरमलेवाडी गावातील ग्रामस्थ नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या वास्तुशांतीचे साहित्य व मारुती धरमले यांच्या लग्नाच्या जथ्था काढून रविवारी रात्री घरी परतत असताना ऐनी हद्दीतील बांधा या ओढ्याजवळ जीप (एमएच १३ ए ४८२९) झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाचजण ठार तर बाराजण जखमी झाले. आज (सोमवारी) सर्वांना एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. गावातील प्रामुख्याने पुढाकार घेणारे आणि घरचे कार्यकर्ते असणारे मृत्यूमुखी पडल्याने सारा गावचं उघड्यावर पडला आहे. प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती, लग्न जथ्था खरेदी करण्यासाठी जाण्याची जुनी परंपरा आजही या गावात आहे. गावातील वास्तुशांती खरेदी व लग्नाच्या जथ्था अशा एकत्रित खरेदीसाठी एकच गाडी करून गावातील प्रमुख गेले होते. गावात अजून कोणत्याही सुविधा नाहीत. अवघ्या ४ वर्षापूर्वी गावात वीज आली आहे. शेतातील पिकांवर जंगली जनावरे ताव मारत असल्याने गावातील तरुण कामानिमित्त शहराकडे जातात. गावात १७ कुटुंबे असून लोकसंख्या १५० इतकी आहे. मृतातील नवरदेव मारुती पांडुरंग धरमले (वय २३) व त्यांचे वडील पांडुरंग दौलू धरमले या पिता-पुत्राचा लग्नाअगोदरच मृत्यू झाला. तर रंगराव शंकर वरूटे (वय ३२), सुनील गणपती कवडे (३०), अजित तुकाराम जाधव (३०) हे कुटुंब प्रमुखच मृत्यू पावल्याने चारीही कुटंुबे उघड्यावर पडली आहेत. गावातील आक्रोश पाहून त्यांची चिमुकली मुले भेदरली होती. सायंकाळपर्यंत कोणीही गावात चुल पेटवली नव्हती. सारा गाव भाऊबंदकी आणि पै-पाहुण्यांचा आहे. त्यामुळे सारा गावच एकत्र रडत दु:ख सागरात लोटला होता. सततच्या रड्यामुळे गावातील महिला अशक्त झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र सरवडे येथील पथकाला पाचारण केले होते. शेजारील गावामध्ये ही दुखवटा पाळला आहे.अपघात रविवारी (११ मे) रात्री दहाच्या सुमारास झाला. हा भाग दुर्गम असल्याने मदत कार्यास विलंब झाला. जखमींना ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. व्ही. गायकवाड यांच्या पथकाने प्रथमोपचार करून त्यांना सोळांकूर, राशिवडे, राधानगरी, मुरगूड येथील पाच रुग्णवाहिका मागवून पुढील उपचारासाठी पाठविले. अपघाताच्या ठिकाणी आर. वाय. पाटील, भिकाजी एकल, मधुकर रामाणे, संजय पाटील, बळवंत पाटील यांच्यासह ऐनी ग्रामस्थांनी मदत केली.जखमी शंकर बाळू कवडे (वय ५०), बाजीराव कवडे २५) शिवाजी कुशाप्पा कवडे (३०), दिनकर कवडे (३०), विलास तुकाराम धरमले (४५), संजय भैरू धरमाले (२५), अरुण दामोदर कवडे (३०) सर्व ऐनी पैकी धरमलेवाडी, साऊताई नामदेव पाटील (वय ३५, फराळे) श्रीकांत साताप्पा करवळे (११, पंडेवाडी), साताप्पा दिनकर पाटील (ऐनी) यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातस्थळी ए. वाय. पाटील, भिकाजी एकल, प्रकाश आबीटकर, विजयसिंह मोरे यांनी भेट दिली.चौकटआणि काळाने घाला घातला...जीपमधील डिझेल संपल्याने आरेगाव येथे थांबल्यावर मागून ऐनी मुक्कामी एस. टी. आली. थांबलेल्यांना पाहून एस. टी. चालकाने एस. टी.तून चला असे सांगितले. पण ऐनीतून ही वाडी पाच किमी दूर आहे. शिवाय सोबत ओझे, रात्रीची वेळ त्यामुळे सर्वांनी जीपमधूनच जाण्याचा निर्णय घेतला. आणि पुढे त्यांच्यावर काळाने घाला घातला. -----जीपमधील संजय भैरू धरमले हे बाहेर फेकल्याने साधे खरचटलेही नाही. त्यांचा मोबाईल पडला. मात्र त्यांनी जखमींपैकी कोणाचातरी मोबाईल घेऊन अपघाताची माहिती गावात दिली. यामुळे तात्काळ मदत मिळाली. -----वाडीत ग्रामस्थांनी रामलिंग देवालयाचा जिर्णोद्धार करून मंदिर नवीन बांधले आहे. त्याचा वास्तुशांती व न्य कार्यक्रम १९ मे रोजी आहे त्यामुळे मृत मारुतीच्या लग्नाचा मुहूर्त २० रोजी नको असे काही ग्रामस्थांचे मत होते.-----तहसीलदार शिवाजी शिंदे, पोलीस निरीक्षक अनिल गाडे यांच्यावर शासकीय अधिकारी, राजकीय नेते, कार्यकर्ते व पै-पाहुण्यांची सांत्वनासाठी वाडीकडे रिघ लागली होती. -----अपघाताचा धक्का बसल्याने मृत व जखमींच्या अनेक नातेवाईकांना रक्तदाब, चक्कर असे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. सरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक दिवसभर येत होते. त्यांनी सोळा जणांवर वैद्यकीय उपचार केले. यामध्ये डॉ. डी. ए. शिंदे, ए. जी. नाईक, ए. एल. जासूद, एस. एस. चौगले, सी. के. पारखे यांचा समावेश होता.फोटो - मेलवर