शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

अरेरे! 7 मुलांची आई पडली 20 वर्षीय तरुणाच्या प्रेमात; 6 महिन्यांच्या लेकाला सोडून गेली पळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 14:43 IST

सात मुलांची आई एका 20 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती आपला पती आणि सात मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली.

राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात प्रेमप्रकरणाची अनोखी घटना समोर आली आहे. येथे सात मुलांची आई एका 20 वर्षांच्या व्यक्तीच्या प्रेमात पडली. ती त्याच्या प्रेमात इतकी वेडी झाली की ती आपला पती आणि सात मुलांना सोडून प्रियकरासह पळून गेली. या महिलेचा सर्वात लहान मुलगा सहा महिन्यांचा आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे महिलेचा प्रियकर दुसरा कोणी नसून तिच्या पतीचाच मित्र आहे. याप्रकरणी आता महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात न्यायालयामार्फत गुन्हा दाखल केला आहे.

भरतपूरच्या उद्योग नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना समोर आला आहे. पतीने मुलांसह पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी केली. महिलेचा पती पीताम त्याची सात मुले आणि पत्नी सुनीता यांच्यासह रारह गावात भाड्याने घर घेऊन राहतो. त्याचा एक मित्र महेश त्याच्याकडे काम करायचा. पीतम सांगतो की, त्याच दरम्यान त्याच्या पत्नीचे महेशसोबत अफेअर होते. त्यानंतर त्याची पत्नी मुलांना सोडून पळून गेली.

दोघेही जवळपास दोन महिन्यांपासून फरार आहेत. या दोघांचाही ठावठिकाणा अद्यापपर्यंत सापडलेला नाही. त्याच्या पत्नीला परत आणले पाहिजे. आपल्या मुलांना न्याय मिळवून देण्यासाठी तो दारोदारी भटकत आहे. पीतम हा मजूर म्हणून काम करतो. सध्या तो आपल्या मुलांची काळजी घेत आहे. पीतम यांना 6 मुली आणि एक मुलगा आहे. मुलगा आता फक्त सहा महिन्यांचा आहे. मात्र सुनीताने त्याचीही पर्वा न करता प्रियकरासह पळ काढला.

राजस्थानमध्ये अशा प्रकारच्या प्रेमप्रकरणाची ही पहिलीच घटना नाही. याआधीही अनेक घटना समोर आल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी जावई त्याच्या सासूसोबत सिरोही येथे पळून गेला होता आणि बुंदीमध्ये सासरे आपल्या सुनेसह पळून गेले होते. यानंतर आता पीतमनेही मदत मागितली आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.