शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
4
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
5
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
6
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
7
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
8
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
9
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
10
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
11
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
12
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
13
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
14
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
15
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
16
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
17
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
18
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
19
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
20
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ँमहत् वाचे वृत्त-आतील पानासाठी

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

निलंबन मागे घेण्याच्या अटीवर कॉंग्रेसचा ठराव मागे!

निलंबन मागे घेण्याच्या अटीवर कॉंग्रेसचा ठराव मागे!
अतुल कुलकर्णी
नागपूर - काँग्रेसचे आमदार विजय वडे˜ीवार यांनी मांडलेला स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा अशासकीय ठराव पाच आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या अटीवर मागे घेण्यास काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे. तर ठराव काढून टाकल्यानंतर आपणास त्याची माहिती दिली गेली, असा खुलासा काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्यामुळे या सगळ्या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली आहे.
स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नवरून भाजपाची कोंडी करण्याच्या हेतूने आ. वडे˜ीवार यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा अशासकीय ठराव मांडला होता. तो स्वीकारलाही गेला. त्याच्या प्रती पिजनहोलमध्ये टाकण्यात आल्या. मात्र शुक्रवारच्या कामकाज पत्रिकेतून तो ठराव गायब झाला! आपण मांडलेला अशासकीय ठराव कामकाज पत्रिकेत नसल्याचे पाहून आ.वडे˜ीवार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. त्यावर विधीमंडळ कार्यमंत्री गिरीष बापट म्हणाले, आम्ही गुरुवारी रात्री वडे˜ीवार यांचा फोन लावला. पण तो न लागल्याने विखे पाटील यांना याबाबत विचारले. कार्यक्रम पत्रिका छपाईसाठी देण्यास उशिर होत होता म्हणून विखे पाटील यांनी होकार दिल्यानंतर तो ठराव मागे ठेवला, असा खुलासा त्यांनी केला. त्यावर, सदस्यांना न विचारता त्यांचे ठराव परस्पर मागे घेणे योग्य नाही. पुन्हा असे घडू नये, अशी सूचना दिलीप वळसे पाटील यांनी केली आणि या मुद्यावर सभागृहात पडदा पडला.
मात्र, आपणास न विचारता आ. वडे˜ीवारांचा ठराव पुढे ढकलण्यात आला, असा खुलासा विखे-पाटील यांनी केल्याने आता नवा वाद सुरु झाला आहे. विखे पाटील म्हणाले, गिरीष बापट काय बोलले, मला माहिती नाही. मी सभागृहात नव्हतो. पण ठराव काढून घेतल्यानंतर मला सांगितले गेले हे खरे आहे. प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंच्या सूचना असल्यामुळेच आपण गप्प बसलो, असे सांगून त्यांनी हा विषय ठाकरेंकडे ढकलून दिला.
या संपूर्ण प्रकरणावर आ. वडे˜ीवार लोकमतशी बोलताना म्हणाले, अशासकीय ठराव माझ्या व्यक्तीगत नावाने होता. तो मागे घेताना मला विचारणे आवश्यक होते. गटनेत्यांना विचारुन तो कसा काय मागे घेता येऊ शकतो? सरकारला स्वतंत्र विदर्भावर चर्चा नको होती म्हणून त्यांनी पळवाट शोधली.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनीही हात वर केले आहेत. ते म्हणाले, स्वतंत्र विदर्भाबद्दल काँग्रेस पक्षाची सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीच भूमिका नाही. त्यामुळे ठराव चर्चेला आला तर त्यावरील मत त्या सदस्याचे व्यक्तीगत मत असेल. आपण ठराव मागे घ्या, असे सांगितले नव्हते. उलट सरकारचीच अडचण होत होती म्हणून त्यांनी तो ठराव मागे घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित सदस्यांसाठी आपण काहीच करत नाहीत, असा संदेश जाऊ नये म्हणून काँग्रेसचे काही नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. जर स्वतंत्र विदर्भाचा ठराव मागे घ्यायचा असेल तर आमच्या सदस्यांचेही निलंबन मागे घ्या, असा प्रस्ताव काँग्रेसने दिला. त्यावर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी निलंबन मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे सुत्रांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाची चर्चा टाळून सगळ्यांनीच आपापली राजकीय गणिते पुर्ण करुन घेतल्याचे यातून उघड झाले आहे.
आ. वडे˜ीवार यांनी मांडलेल्या ठरावाने भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याची आयतीच संधी चालून आलेली असताना पक्षांतर्गत वादामुळे काँग्रेस नेत्यांनी ती गामवली, अशी खंत काँग्रेस आमदार व्यक्त करत आहेत.