शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नदीकिनारची सर्वाधिक प्रदूषित शहरे महाराष्ट्रात; पर्यावरण मंत्रालयाचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:08 IST

गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत.

नितीन अग्रवालनवी दिल्ली : गंगा प्रदूषणमुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र खातेच निर्माण केले असले तरी देशभरातील शेकडो शहरे प्रदूषित नद्यांच्या विळख्यात आहेत. अशा शहरांची संख्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे. नदीकिनारी असलेल्या प्रदूषित विभागांची सर्वाधिक संख्याही महाराष्ट्रातच आहे. या नद्यांमधील प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, त्याचे परिणाम दीड ते दोन वर्षांत दिसतील असे सरकारचे म्हणणे आहे.पर्यावरण मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात प्रदूषित नद्यांच्या तीरावर वसलेल्या शहरांची संख्या ६५० असून, त्यातील १६१ शहरे महाराष्ट्रात आहेत. एकूण २७५ नद्यांच्या सर्वाधिक प्रदूषित ३०२ विभागांची यादी तयार करण्यात आली असून, त्यातील ४९ विभाग महाराष्ट्रात आहेत. राज्यातील प्रदूषित नद्यांमध्ये बाणगंगा, गोदावरी, भीमा, कृष्णा, उल्हास, कुंडलिका, तापी, गिरणा, पंचगंगा, नीरा, रंगावली, इंद्रायणी, मिठी, वशिष्ठी, अंबा, अमरावती, बिंदुसरा, धारणा, हिवरा, मोर, मोरणा, मुळा, मुठा, पवना, पूर्णा यांचा समावेश आहे.कृती आराखडानद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी पर्यावरण मंत्रालय एक आराखडा तयार करत आहे. नागपूर, नाशिक व नांदेडमध्ये त्यादृष्टीने कामास सुरुवात झाली आहे. सांडपाणी नदीत सोडले जाण्यापूर्वी त्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प उभारले जात आहेत.नद्यांच्या पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी महाराष्ट्रात २५० ठिकाणी निरीक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.या केंद्रांकडून गोळा करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार मुळा-मुठा, गोदावरी, तापी, नीरा, भातसा या नद्यांमधील प्रदूषणाची पातळी जरा कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच या नद्यांतील पाण्याची गुणवत्ता वाढली आहे.मुंबई सर्वाधिक प्रदूषितनदीकिनारच्या सर्वाधिक प्रदुषित शहरांमध्ये मुंबई, पुणे, नांदेड, अकोला, नागपूर, सांगली, अमरावती, कल्याण, पनवेल यांचा समावेश आहे. राज्यातील ज्या ४९ ठिकाणी नद्या सर्वाधिक प्रदूषित आहेत त्यातील २४ ठिकाणी नद्यांचा प्रवाह अतिशय धीमा आहे. त्यामुळे प्रदूषणाला दूर करण्याची नदीची क्षमताच संपल्यात जमा आहे. उद्योगांचे सांडपाणी नदीत सोडण्यात येते. कचराही टाकण्यात येतो. त्यामुळे नद्यांच्या प्रदूषणाने अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे.