शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

अत्यंत महत्त्वाचे सुधारित पान लिड -भाजपात मोर्चेबांधणी

By admin | Updated: May 14, 2014 00:09 IST

भाजपात मोर्चेबांधणी

भाजपात मोर्चेबांधणी
संघाचे मोदींना सर्वाधिकार : राजनाथ पक्षाध्यक्षच राहणार
हरीश गुप्ता/नवी दिल्ली : मतदानोत्तर चाचण्यांच्या आधारे अनेक वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात दिल्लीच्या सत्तेेची माळ घालून मोकळ्या झाल्या असतानाच भाजपाध्यक्षपदी राजनाथसिंह हेच कायम राहणार असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने दिले आहेत़
आपण पक्षाध्यक्षपदाचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू, असे खुद्द राजनाथ सिंह सांगत असले तरी त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही़ मोदी सरकारमध्ये येण्यास राजनाथ यांनी स्पष्ट नकार दिलेला नाही, असे त्यांचे समर्थक खासगीत सांगत आहेत़ पक्षाध्यक्ष म्हणून आडवाणी आणि पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या प्रकारे सलोख्याने काम केले, तसे मोदींसोबत काम करण्याचा राजनाथ यांचा मानस आहे. यामुळे साहजिकच उत्तर प्रदेशातील एक वजनदार नेते गृहमंत्रालयासोबत उपपंतप्रधानपद मिळण्याची आस बाळगून आहेत़
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने मात्र स्वत: पडद्याआड राहून नरेंद्र मोदींना सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे मोदींची व्यक्तिश: भेट घेतली आणि यानंतर पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांशीही त्यांनी सल्लामसलत केली़ या बैठकीत भागवतांनी मोदींवर विश्वास असल्याचे बोलून दाखवल्याचे समजते़ मोदी एक सच्चे स्वयंसेवक असून त्यांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत, मोदी जो काही निर्णय घेतील, तो योग्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांच्यावर भारी पडतील अशी दोन समांतर सत्ताकेंद्र संघाला नको आहेत़ रालोआ सरकारमध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना संघ लालकृष्ण आडवाणींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला़ यावेळी मात्र अशी शक्यता नाही़
राजनाथ यांना मोदी सरकारमध्ये न घेतल्यास नितीन गडकरी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे़ कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास मोदींप्रमाणेच गडकरींचाही केंद्रातील सरकारमध्ये काम करण्याचा पहिला अनुभव असेल आणि त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्यात काम सहज सोपे होईल, असे आडाखे आहेत़
मोदी सरकारमध्ये अरुण जेटली क्रमांक दोनच्या स्थानावर असतील, असेही संकेत आहे़ जेटली हे दिल्लीतील मोदींचे कान आणि डोळे आहेत़ मोदींचे निकटस्थ मानले जाणार्‍या अमित शहांसोबतही त्यांनी काम केले आहे़ मोदी आणि जेटलींमध्ये चांगले संबंध आहेत़ पक्ष आणि सरकारबाबतच्या प्रत्येक निर्णयासंदर्भात मोदी त्यांच्याशी संवाद साधतात़ एवढेच नव्हे तर, संघाबाहेर अशी व्यक्ती जिच्यावर मोदी विश्वास ठेवू शकतात ते अरुण जेटली हेच आहे़त जेटलींना अर्थमंत्रालयात स्वारस्य आहे़ मंत्रिमंडळ स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहणार असलेल्या जेटलींच्या या मागणीवर कालांतराने निर्णय होईलच़ जेटली उपपंतप्रधान झाले नाहीत तरीही मोदी सरकारमध्ये त्यांचे क्रमांक दोनचे स्थान अढळ मानले जात आहे़
अशा स्थितीत मोदींची खरी अडचण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आहेत़ या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आताशा कुणापासून लपून राहिलेली नाही़ या पार्श्वभूमीवर जोशींच्या गळ्यात लोकसभाध्यक्षपदाची माळ टाकली जाण्याचे संकेत आहेत़ तर लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्षपद वा राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या धर्तीवर एक नवीन समिती स्थापन करुन त्याचे अध्यक्षपद त्यांना दिले जाऊ शकते़ गांधीनगर येथे उद्या होणार्‍या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो़
केवळ पांढरा हत्ती ठरलेला नियोजन आयोग गुंडाळण्याची मोदींची योजना आहे़ मोदींचे विश्वासू अमित शहा यांना पक्षातच ठेवले जाणे अपेक्षित आहे़ येत्या काळात विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्‍या सहा राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल, अशी शक्यता आहे़ या अनुषंगाने बुधवारी गांधीनगर येथे बैठक होत आहे़ मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीसाठी भाजपाचे अनेक बडे नेते गांधीनगरकडे रवाना झाले आहेत़