शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बँकांचे सर्वाधिक घोटाळे महाराष्ट्रात; घोटाळ्यांमुळे दररोज १०० कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 09:07 IST

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून धक्कादायक माहिती समोर

नवी दिल्ली : मागील सात वर्षांपासून बँक घोटाळ्यांतील रक्कम कमी कमी होत असली तरी भारताला दररोज १०० कोटी रुपये या घोटाळ्यांमुळे गमवावे लागत आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महाराष्ट्रातील बँकांत सर्वाधिक घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यात अडकलेल्या एकूण पैशांपैकी ५० टक्के पैसा महाराष्ट्रातील बँक शाखांतील आहे. त्याखालोखाल दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू यांचा समावेश आहे. या पाच राज्यांत मिळून दोन लाख कोटी रुपये बँक घोटाळ्यात अडकले आहेत. देशातील एकूण बँक घोटाळ्यांच्या तुलनेत हे प्रमाण ८३ टक्के आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत देशात २.५ लाख कोटी रुपयांचे बँक घोटाळे उघडकीस आले आहेत. वित्त मंत्रालयाने म्हटले की, घोटाळ्यांची तत्पर माहिती आणि प्रतिबंध यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी घोटाळ्यातील रक्कम कमी कमी होत आहे.घोटाळ्याचे अनेक मार्गरिझर्व्ह बँकेने घोटाळ्यांची ८ प्रकारांत विभागणी केली आहे. हे घोटाळे बनावट साधने वापरणे, खात्यात फेरफार करणे, खोटी खाती तयार करणे, मालमत्तांचे रुपांतरण, अवैध कर्ज सुविधा, अवैध वरदहस्त, हलगर्जीपणा, फसवणूक, बनावट दस्तावेज, विदेशी चलन व्यवहारांतील अनियमितता अशा अनेक मार्गांनी करण्यात आले आहेत.असे बुडाले पैसे२०१५-१६  ६७,७६० कोटी रुपये२०१६-१७  ५९,९६६.४ कोटी रुपये२०१९-२०     २७,६९८.४ कोटी रुपये२०२०-२१     १०,६९९.९ कोटी रुपये२०२१-२२    ६४७.९ कोटी रुपये(पहिले ९ महिने) 

टॅग्स :fraudधोकेबाजी