नवी दिल्ली : काश्मिरी जनतेचे सर्व लोकशाही हक्क हिरावून घेऊन सरकारकडून त्यांची जी मुस्कटदाबी सुरू आहे त्याहून अधिक देशविरोधी दुसरे काही असू शकत नाही, अशी प्रखर टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी रविवारी केली.जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा काढणे हा राष्ट्रवादी विचाराने घेतलेला देशहिताचा निर्णय असूनही विरोधी पक्ष त्याचे राजकारण करीत आहेत, या सत्ताधाऱ्यांकडून केल्या जाणाºया आरोपाला प्रत्युत्तर देताना प्रियांका यांनी हे वक्तव्य केले.काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षनेत्यांचे एक शिष्टमंडळ जम्मू-कामीरमधील सद्य:स्थितीचा आढावा घेण्यासाठी तेथील राज्यपालांच्याच निमंत्रणावरून शनिवारी श्रीनगरला गेले होते; परंतु त्यांना विमानतळावरूनच परत पाठविण्यात आले होते.व्हिडिओ टिष्ट्वटरवरश्रीनगरहून दिल्लीला परत येत असताना विमानात काश्मीरमधील एक महिला त्यांना सोसाव्या लागणाºया त्रासाची कैफियत करीत राहुल गांधी यांच्या पाया पडून ‘आम्हाला यातून सोडवा’, अशी गयावया करीत असल्याचा एक व्हिडिओ प्रियांका गांधींनी टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केला.या टष्ट्वीटमध्ये प्रियांका यांनी म्हटले आहे की, हे असे आणखी किती काळ सुरू राहणार?
काश्मिरीेंची मुस्कटदाबी हेच सर्वाधिक देशविरोधी कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 04:56 IST