शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

गारपिटीचा बाराशे शेतकर्‍यांना फटका

By admin | Updated: December 31, 2014 18:58 IST

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्‘ातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़

अहमदनगर: अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे़ जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता आणि पारनेर तालुक्यातील ५१५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, गारपिटीचा १ हजार २६५ शेतकर्‍यांना फटका बसला आहे़ सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक मदतीस हे शेतकरी पात्र होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले़ जिल्ह्यात ११ व १२ डिसेंबर रोजी अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली़ या गारपिटीमुळे तीन तालुक्यातील कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, मका, द्राक्ष, बोर, डाळिंब, चिकू आणि पपई, यासारखी पिके भुईसपाट झाली़ इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते़ त्यामुळे शासनाने गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर केली़ गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील १ हजार २६५ शेतकर्‍यांच्या ५१६ हेक्टरील पिकांचे ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झाले आहे़ तर ५० टक्केपेक्षा कमी नुकसान झालेल्या शेतकर्‍यांची संख्या ४ हजार २९७ इतकी आहे़ परंतु केवळ ५० टक्केपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनाच आर्थिक मदत मिळते, असा प्रशासनाचा अनुभव आहे़ त्यामुळे सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या मदतीबाबत शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे़़़़अशी आहे आर्थिक मदत (प्रति हेक्टर)जिरायती- १० हजार, बागायती- १५ हजार, फळबाग-२५ हजार ़़़कुठे किती नुकसान५० टक्केपेक्षा अधिककोपरगावबाधित क्षेत्र- ११७शेतकरी- २७३़़़राहाताबाधित क्षेत्र-३९९़५०शेतकरी- ९९२़़़५० टक्केपेक्षा कमीकोपरगावक्षेत्र-८७१़७१शेतकरी-९६२़़़़राहाताक्षेत्र-८१४़५०शेतकरी-२६७़़़पारनेरक्षेत्र-१९०४शेतकरी-३०६८