शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

१५८ विदेशी खात्यांमधून अमृतपाल सिंगला रसद, २८ खात्यांद्वारे पाच कोटींहून अधिक रक्कम पाठवली, सहा दिवसांपासून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 07:15 IST

उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपाल याचा सहकारी तजिंदर सिंग ऊर्फ गोरखा बाबा याला लुधियानात अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा खासगी रक्षक होता. 

नवी दिल्ली : पंजाब पोलिस ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याला अद्यापही अटक करू शकलेले नाहीत. १५८ विदेशी खात्यांतून पैसे पाठवले जात होते. यापैकी २८ खात्यांमधून पाच कोटींहून अधिक रक्कम पाठवण्यात आली होती. ही खाती पंजाबच्या माझा व मालवा भागांशी संबंधित आहेत, अशी माहिती पोलिस व गुप्तचर यंत्रणांच्या तपासात समोर आली आहे. उत्तराखंडमध्येही अमृतपालसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. अमृतपाल याचा सहकारी तजिंदर सिंग ऊर्फ गोरखा बाबा याला लुधियानात अटक करण्यात आली आहे. तो अमृतपालचा खासगी रक्षक होता. 

२७ रोजी शीख समुदायाची बैठक  पंजाबमधील सद्य:स्थितीबाबत अकाल तख्तचे जत्थेदार ग्यानी हरप्रीत सिंह २७ मार्च रोजी शीख समुदायाची बैठक घेणार आहेत.   या बैठकीला अनेक विचारवंत येणार असून, पंजाबमधील बिघडलेली परिस्थिती कशी सुधारता येईल यावर चर्चा होणार आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सरकारही या बैठकीवर बारीक लक्ष ठेवून आहे.

अमृतपालला आश्रय देणारी महिला जेरबंदचंडीगड : अमृतपाल सिंग व त्याचा साथीदार पापलप्रीत सिंग यांना आपल्या घरी आश्रय देणाऱ्या एका महिलेला हरयाणा पोलिसांनी अटक केली आहे. बलजित कौर असे या महिलेचे नाव असून, ती हरयाणाच्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातील शाहाबाद येथील रहिवासी आहे. अमृतपालसिंग कुरुक्षेत्र येथूनच पंजाबबाहेर पळून गेला असावा, असे पोलिसांना वाटते. 

टॅग्स :Punjabपंजाब