शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षांत चार हजार जवानांची फौज करणार नक्षल्यांचा बीमोड; निर्णायक लढा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 05:28 IST

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांना चहुबाजूंनी घेरले, गेल्या तीन वर्षांत असे ४० तळ उभारण्यात आले आहेत.

नवी दिल्ली: छत्तीसगडच्या बस्तरमध्ये हिंसाचाराने प्रभावित क्षेत्रांत नक्षलवाद्यांविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) चार हजारांहून अधिक जवान तैनात केले जात आहेत. यासाठी चार बटालियन राज्यात दाखल झाल्या आहेत. मार्च २०२६ पर्यंत देशातून नक्षलवादाच्या माओवादी समस्येचा कायमस्वरूपी नायनाट करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे बोलताना डाव्या विचारसरणीचा दहशतवाद निपटून काढण्यासाठी भक्कम आणि कठोर मोहिमेची गरज प्रतिपादित केली होती. त्यानुसार ही तयारी सुरू आहे. गेल्या दोन-तीन वर्षात नक्षलग्रस्त राज्यांत सुरक्षा दलांनी कारवाया करून नक्षल्यांना जेरीस आणले आहे.

अशी असेल लढ्याची योजना

झारखंडमधून तीन आणि बिहारमधून एक अशा बटालियन परत बोलावून त्या। तीन छत्तीसगडमध्ये तैनात केल्या जात आहेत. रायपूरपासून दक्षिणेला ५०० किमी अंतरावर असलेल्या बस्तर क्षेत्रात देशांतर्गत सुरक्षेसाठी केंद्रीय राखीव पोलिस दलाचे हे जवान तैनात असतील.

नक्षलवाद छत्तीसगडमध्ये एकवटला झारखंड, बिहारमध्ये आता नक्षलवादी कारवाया अत्यंत नगण्य असून, ते आता छत्तीसगडमध्ये एकवटले आहेत. त्यामुळे दोन वर्षात नक्षलवादाचा नायनाट करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. दंतेवाडा व सुकमासह ओडिशा, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाला लागून असलेल्या सीमाभागांत हे जवान तैनात केले जात आहेत.

कोब्रा'ची घेणार मदत या कारवाईत सीआरपीएफच्या कोब्रा बटालियनमधील जवानांची मदत घेतली जाणार असून, नक्षलग्रस्त दुर्गम भागात विशेष तळ उभारले जातील.  ही मोहीम संपल्यानंतर अशा नक्षलग्रस्त भागांत विकासकामे सुरू करता येतील. छत्तीसगडमध्ये गेल्या तीन वर्षांत असे ४० तळ उभारण्यात आले आहेत.

आव्हाने अन् तयारी

दुर्गम भागांत दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचे होणारे हल्ले.

दक्षिण बस्तरमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. त्यामुळे जवानांना तांत्रिक मदत व हेलिकॉप्टरसह इतर आधुनिक साधनांची गरज पडेल.

दुर्गम भागात असलेल्या जवानांना सुसज्ज वाहने, श्वान पथके आणि इतर सुरक्षा यंत्रणेसह रेशन आणि इतर सामग्री पुरवली जात आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीCentral Governmentकेंद्र सरकार