शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

‘पॉक्सो’ कायद्यात आणखी दुरुस्ती!, मुलांनाही मिळेल न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 05:20 IST

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो कायदा) लिंगभेद दूर करून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींप्रमाणेच पीडित मुलांनाही समान न्याय देता यावा यासाठी

नवी दिल्ली : बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो कायदा) लिंगभेद दूर करून लैंगिक अत्याचार झालेल्या मुलींप्रमाणेच पीडित मुलांनाही समान न्याय देता यावा यासाठी या कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने केला आहे.विशेष म्हणजे १२ वर्षांहून कमी वयाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्यास फाशीच्याही शिक्षेची तरतूद करणारा वटहुकूम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जारी केल्यानंतर असाच अत्याचर होणाºया मुलांचे काय असा प्रश्न प्रकर्षाने उपस्थि झाला होता. या पार्श्वभूमीवर, महिला व बालकल्याण मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत टिष्ट्वटर हॅण्डलवर म्हटले की, लिंगभेदविरहीत कायदे करण्याचा सरकारचा नेहमीच आग्रह असतो. म्हणूनच ‘पॉक्सो’ कायद्यातील लिंगभेदी तरतुदी दूर करून लैंगिक अत्याचार होणाºया मुली व मुलांना समान न्याय मिळावा यासाठी या कायद्यात आवश्यक त्या दुरुस्त्या करण्याचा प्रस्ताव मंत्रालयाने केला आहे.चित्रपट निर्मात्या आणि कार्यकर्त्या इंन्सिया दरिवाला ‘चेंज आॅर्ग’वर अलीकडेच एक आॅनलाइन याचिका करून मुलांचे होणारे लैंगिक शोषण हा अद्यापही भारतात दुर्लक्षित विषय असल्याकडे लक्ष वेधले होते. महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी दरिवाला यांच्या मताशी सहमती दर्शवून देशातील लैंगिक अत्याचारपीडित मुलांचे पहिले सर्वेक्षण हाती घेण्याचे सांगितले होते.‘चेंज आॅर्ग’वर लिहिलेल्या उत्तरात मनेका गांधी यांनी म्हटले होते की, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगास या विषयात लक्ष घालण्यास सांगितले. त्यानुसार आयोगाच्या परिषदेत झालेल्या विचारमंथनातून असे एकमत दिसले की, लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांनाही मुलींप्रमामे भरपाई देण्यासह अन्य बाबतीतही समान न्याय देण्यासाठी ‘पॉक्सो’ कायद्यात दुरुस्ती करण्याची गरज आहे.दरिवाला यांच्या याचिकेच्या उत्तरात मनेका गांधी यांनी असेही लिहिले की, बाल लैंगिक अत्याचार हा गुन्हा लिंगनिरपेक्ष आहे. असे लैंगिक अत्याचार मुलींप्रमाणे मुलांवरही होत असतात. असे अत्याचार झालेली मुले समाजात बदनामी होईल, या भीतीने वाच्यता न करता ही सल मनात ठेवून आयुष्य जगतात. ही एक गंभीर समस्या असून तिचेही निराकरण करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Maneka Gandhiमनेका गांधी