मंजुरीपेक्षा जास्त कर्जवाटप ११ गटसचिव निलंबित तक्रारीनंतर चौकशी : धरणगावसह जिल्हाभरात २०० कोटींचे बोगस कर्जवाटप
By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST
जळगाव : क्षेत्र कमी असताना जास्तीचे दाखवून मंजुरीपेक्षा जास्त कर्ज वाटप तसेच टिश्यू कल्चर केळीसाठी बोगस कर्जवाटप केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ११ गटसचिवांना निलंबित करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यासह जिल्हाभरात सुमारे २०० कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप झाल्याने आता उर्वरित तालुक्यात चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मंजुरीपेक्षा जास्त कर्जवाटप ११ गटसचिव निलंबित तक्रारीनंतर चौकशी : धरणगावसह जिल्हाभरात २०० कोटींचे बोगस कर्जवाटप
जळगाव : क्षेत्र कमी असताना जास्तीचे दाखवून मंजुरीपेक्षा जास्त कर्ज वाटप तसेच टिश्यू कल्चर केळीसाठी बोगस कर्जवाटप केल्याप्रकरणी धरणगाव तालुक्यातील ११ गटसचिवांना निलंबित करण्यात आले आहे. धरणगाव तालुक्यासह जिल्हाभरात सुमारे २०० कोटी रुपयांचे बोगस कर्जवाटप झाल्याने आता उर्वरित तालुक्यात चौकशी सुरू करण्यात आली आहे.जिल्हा बँकेतर्फे विविध कार्यकारी सोसायटी मार्फत पीक कर्जाचे वाटप करण्यात येत असते. यात धरणगाव तालुक्यातील ११ गटसचिवांनी क्षेत्र कमी असताना जास्तीचे दाखवून मंजुरीपेक्षा जास्त कर्ज वाटप केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या गटसचिवांना जिल्हा उपनिबंधकांनी निलंबित केले आहे. धरणगाव तालुक्यात सर्वाधिक कर्जवाटप झाली आहे. यासह जळगाव, बोदवड, जामनेर, पाचोरा, चाळीसगाव, रावेर, यावल तालुक्यात देखील अशा स्वरुपाचे बोगस कर्जवाटप झाल्याचे उघड झाले आहे. जिल्हाभरातील जास्तीचे क्षेत्र तसेच टिश्यू कल्चर केळीसाठी देण्यात आलेल्या बोगस कर्जाचा आकडा हा २०० कोटींच्या घरात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेतर्फे धरणगाव नंतर उर्वरित तालुक्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.दरम्यान, अमळनेर, पारोळा व भुसावळ या तीन तालुक्यातून मात्र बोगस कर्जवाटपाची तक्रार झालेली नाही.धरणगाव तालुक्यात टिश्यू कल्चर केळीसाठी वाटप करण्यात आलेल्या कर्जाच्या चौकशी दरम्यान बोगस कर्जाचा प्रकार उघड झाला. या प्रकरणी ११ गटसचिवांना निलंबित केले आहे. उर्वरित तालुक्यातील कर्जवाटपाचीदेखील चौकशी सुरू आहे.रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्ष, जिल्हा बँक जळगाव.