नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत आढळलेल्या नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे. या कालावधीत ३०,२५४ नवे रुग्ण आढळले असून, बरे झालेल्यांची संख्या ३३,१३६ आहे. जगामध्ये या आजाराच्या संसर्गातून बरे झालेल्यांचे प्रमाण भारतात सर्वाधिक म्हणजे ९४.९३ टक्के असून मृत्यूदर अवघा १.४५ टक्के आहे.केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, देशात सक्रिय रुग्णांची संख्या सलग सातव्या दिवशी चार लाखांहून कमी होती. सध्या ३,५६,५४६ सक्रिय रुग्ण असून त्यांचे प्रमाण ३.६२ टक्के आहे. या आजारातून ९३,५७,४६४ जण बरे झाले असून कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या ९८,५७,०२९ झाली आहे. या संसर्गामुळे बळींची संख्या १,४३,०१९ वर पोहोचली आहे.भारतामध्ये अमेरिकेपेक्षा बळींची संख्या कमीअमेरिकेत गेल्या चोवीस तासांत २ लाखांपेक्षा अधिक नवे रुग्ण आढळून आले, तर भारतात ही संख्या ३० हजार होती. याच कालावधीत अमेरिकेत बळींची संख्या २७४९ तर भारतात ३९१ इतकी आहे. अमेरिकेत सक्रिय रुग्णांची संख्या ६५ लाख असून, भारतामध्ये हा आकडा साडेतीन लाखांपेक्षा अधिक आहे.जगभरात कोरोना रुग्णांची संख्या ७ कोटी २१ लाख बरे झालेल्या लोकांची संख्या५ कोटी ५ लाख१६ लाख ११ हजार जणांचा बळी गेला आहे.
CoronaVirus News: देशासाठी दिलासादायक बातमी; नव्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 07:01 IST