शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या, मग बुलेट ट्रेनचा अट्टहास कशाला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2017 20:52 IST

मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे.

मुंबई - दररोज धावणा-या मुंबई ते अहमदाबाद एक्स्प्रेसमध्ये जवळपास 40 टक्क्यांहून अधिक सीट्स रिकाम्या असतात, अशी धक्कादायक बाब माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणली आहे. मुंबई ते अहमदाबाद रेल्वेत गेल्या 3 महिन्यांत 40 टक्के, तर अहमदाबाद ते मुंबई 44 टक्के सीट्स रिकाम्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी 1 लाख कोटी खर्च प्रस्तावित आहे. त्यामुळे भाजपा सरकारनं सद्यस्थितीचा अभ्यास केला नसल्याचा दावा अनिल गलगलींनी केला आहे. गलगलींनी ही माहिती पश्चिम रेल्वेच्या निदर्शनास आणून दिली आहे. 3 महिन्यांत पश्चिम रेल्वेला 29.91 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. पश्चिम रेल्वेकडे मुंबई ते अहमदाबाद आणि अहमदाबाद ते मुंबई अशा 3 महिन्यांची विविध माहिती मागितली होती. पश्चिम रेल्वेने 1 जुलै 2017 पासून 30 सप्टेंबर 2017 पर्यंतची माहिती दिली.कोणत्या ट्रेन रेल्वे प्रशासनासाठी फायदेशीरमुंबई-अहमदाबाददरम्यान 31 मेल एक्सप्रेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांत या एक्प्रेसमधून 3 लाख 98 हजार प्रवाशांनी प्रवास केला. परंतु 7 लाख 6 हजार 446 सीट्स रेल्वे प्रशासनाकडे उपलब्ध होत्या. 15 कोटी 78 लाख 54 हजार 489 एवढं आर्थिक नुकसान सहन करणाऱ्या पश्चिम रेल्वेला रुपये 42 कोटी 53 लाख 11 हजार 471 इतका महसूल अपेक्षित होता. पण फक्त 26 कोटी 74 लाख 56 हजार 982 एवढा महसूल प्रवाशांच्या तिकिटातून मिळाला आहे. दुरांतो, शताब्दी, गुजरात मेल, भावनगर, सौराष्ट्र, विवेक, भुज, लोकशक्ती यांसारख्या एक्स्प्रेसचा या गाड्यांमध्ये समावेश आहे.मुंबई ते अहमदाबाद अशा 30 मेल एक्सप्रेसने 4 लाख 41 हजार 795 प्रवाशांनी प्रवास केला होता. प्रत्यक्षात 7 लाख 35 हजार 630 सीट्स होत्या. एकूण महसूल 44 कोटी 29 लाख 8 हजार 220 रुपये येणं अपेक्षित असताना 30 कोटी 16 लाख 24 हजार 623 रुपये एवढा महसूल मिळाला होता. म्हणजे पश्चिम रेल्वेला 14,12,83,597 एवढं आर्थिक नुकसान सोसावं लागलं.शताब्दीमध्येही प्रवासी नाहीत12009 शताब्दी ज्या कार चेअरसाठी प्रसिद्ध आहे, त्यात अहमदाबादला जाताना 72 हजार 696 पैकी फक्त 36 हजार 117 प्रत्यक्ष प्रवासी मिळाले होते. 7 कोटी 20 लाख 82 हजार 948 रुपयांऐवजी 4 कोटी 11 लाख 23 हजार 86 रुपये कमाई झाली होती.Executive चेअरच्या 8 हजार 216 पैकी 3 हजार 468 सीटसवर प्रवासी होते. यातून 1 कोटी 63 लाख 57 हजार 898 ऐवजी 64 लाख 14 हजार 345 कमाई झाली होती. अहमदाबादहून मुंबईकडे परतताना 12010 या शताब्दीमध्ये 67 हजार 392 पैकी 22 हजार 982 सीट्सवर प्रवासी होते. यातून 6 कोटी 39 लाख 8 हजार 988 ऐवजी 2 कोटी 51 लाख 41 हजार 322 इतकीच कमाई झाली होती. Executive चेअरच्या 7 हजार 505 पैकी फक्त 1 हजार 469 सीट्सवर प्रवासी होते. ज्यांच्याकडून रेल्वेला 1 कोटी 45 लाख 49 हजार 714 रुपयांऐवजी 26 लाख 41 हजार 83 रुपये महसूल मिळाला होता.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेनNarendra Modiनरेंद्र मोदी