फायनान्सच्या नावाने लुटणारी टोळी सक्रीय?
By admin | Updated: February 28, 2016 22:31 IST
जळगाव: एचडीएफसी फायनान्सचा एजंट सांगून विजय विष्णू वाडकर (रा.शाहू नगर) यांना अठरा हजार रुपयात गंडा घालणार्या विलास सुदाम लोंगड व अनिल भाऊसाहेब सुभाने (दोन्ही रा.गंगापुर जि.औरंगाबाद) या दोघांसह त्यांच्यासमेवत आणखी काही जण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. धुळे, जळगाव, मालेगव व नाशिक येथे ही टोळी सक्रीय असावी असाही कयास पोलिसांना आहे.
फायनान्सच्या नावाने लुटणारी टोळी सक्रीय?
जळगाव: एचडीएफसी फायनान्सचा एजंट सांगून विजय विष्णू वाडकर (रा.शाहू नगर) यांना अठरा हजार रुपयात गंडा घालणार्या विलास सुदाम लोंगड व अनिल भाऊसाहेब सुभाने (दोन्ही रा.गंगापुर जि.औरंगाबाद) या दोघांसह त्यांच्यासमेवत आणखी काही जण असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. धुळे, जळगाव, मालेगव व नाशिक येथे ही टोळी सक्रीय असावी असाही कयास पोलिसांना आहे. दरम्यान, दोघांना शहर पोलिसांनी रविवारी न्या.ए.एम.मानकर यांच्या न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. लोंगड व सुभाने हे दोघं जण शनिवारी वाडकर यांच्या घरी आले होते. आम्ही फायनान्स कपंनीचे एजंट असून तुम्हाला दुचाकीसाठी फायनान्स करुन देतो असे सांगून जनता बॅँकेचे चार कोरे धनादेश त्यांच्याकडून घेतले. एक धनादेश धुळे बॅँकेतून वटवून अठरा हजार रुपये काढून घेतले होते.अटकेत असताना त्यांच्याकडे सातपुडा ऑटोमोबाईल्स, प्रभुंजन ऑटोमोबाईल्स, रॉयल मोटर्स मालेगाव यांचे कोटेशन व पावत्या आढळून आल्या. त्यावरुन या गुन्ाची व्याप्ती मोठी आहे. यात त्यांना कोण मदत करते याचाही पोलीस शोध घेत आहेत.