पुण्याच्या विवाहितेचा जळगावात विनयभंग
By admin | Updated: January 14, 2017 00:02 IST
जळगाव : पुणे येथील विवाहिता आपल्या नातेवाईकासह रामानंद परिसरातील भगवाननगरातील पुतण्यास भेटण्यास आली असता, एकाने तिचा विनयभंग केल्याची घटना घडली होती़ याप्रकरणी शुक्रवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ फिर्यादी महिला नातेवाईकासह तिचा पुतण्या याला भेटण्यासाठी दि़ २२ डिसेंबर २०१६ रोजी जळगावात आली होती़ यादरम्यान भगवान नगरातील सुधीर पुंडलिक चव्हाण याने भेटण्याच्या कारणावरून विवाहितेसोबत वाद घातला व तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले़ याप्रकरणी दि़ १३ जानेवारी रोजी विवाहितेच्या फिर्यादीवरून सुधीर चव्हाण विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मनोज वाघमारे हे करीत आहेत़