शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
3
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
4
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
5
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
6
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
7
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
8
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
9
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
10
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
11
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
12
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
13
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
14
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
15
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
16
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
17
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
18
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
19
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
20
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या

मोहन भागवत तर राष्ट्रपिता; भेटीनंतर इमाम संघटनेच्या प्रमुखांकडून RSS प्रमुखांचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 18:09 IST

जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी RSS प्रमुखांनी अनेक मुस्लिम विचारवंतांच्या भेटी घेतल्या.

नवी दिल्ली:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bahgwat) यांची भेट घेतल्यानंतर अखिल भारतीय इमाम संघटनेचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांनी भागवतांचे 'राष्ट्रपिता' आणि 'राष्ट्राचे ऋषी' असे वर्णन केले आहे. मोहन भागवत यांनी गुरुवारी दिल्लीतील मशिदीत उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली, यानंतर इलियासी यांनी त्यांना राष्ट्रपती म्हटले. इलियासी म्हणाले- 'आम्ही सर्व मानतो की राष्ट्र सर्वोपरी आहे. आमचा डीएनए एक आहे, फक्त अल्लाहची उपासना करण्याची पद्धत वेगळी आहे.'

मोहन भागवत आणि इलियासी यांनी कस्तुरबा गांधी मार्गावरील मशिदीत तासाभराहून अधिक काळ बंद दाराआड बैठक घेतली. भारतीय इमाम संघटनेचे कार्यालय येथेच आहे. भागवत यांच्यासोबत संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, राम लाल आणि इंद्रेश कुमार होते. राम लाल हे यापूर्वी भाजपचे संघटनात्मक सचिव होते तर कुमार हे मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संरक्षक आहेत. या भेटीची माहिती देताना उमर अहमद इलियासी यांचे भाऊ सुहैब इलियासी म्हणाले, 'आमच्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आमच्या निमंत्रणावर भागवत आले. यातूनही देशात चांगला संदेश गेला आहे.'

मुस्लिम विचारवंतांचीही भेट घेतली आरएसएस प्रमुख मोहन भागवत देशातील जातीय सलोखा मजबूत करण्यासाठी मुस्लिम विचारवंतांशी चर्चा करत आहेत. अलीकडेच त्यांनी दिल्लीचे माजी लेफ्टनंट गव्हर्नर नजीब जंग, माजी मुख्य निवडणूक आयुक्त एसवाय कुरेशी, अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे माजी कुलगुरू लेफ्टनंट जनरल जमीरुद्दीन शाह, माजी खासदार शाहिद सिद्दीकी आणि उद्योगपती सईद शेरवानी यांची भेट घेतली होती.

'काफिर' ते 'जिहादी'वर चर्चाया बैठकीत भागवत यांनी हिंदूंसाठी 'काफिर' हा शब्द वापरल्याचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्यामुळे चांगला संदेश जात नसल्याचे म्हटले होते. त्याच वेळी मुस्लिम विचारवंतांनी काही उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी मुस्लिमांना जिहादी आणि पाकिस्तानी म्हणण्यावर आक्षेप घेतला होता. मुस्लीम विचारवंतांनी भागवतांना असेही सांगितले की, काफिर या शब्दाच्या वापरामागील हेतू काही वेगळाच आहे, परंतु काहीजण त्याचा अपमानास्पद शब्द म्हणून वापर करत आहेत. विचारवंतांची चिंता समजून घेत आरएसएस प्रमुख सर्व हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचे म्हटले.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघHinduहिंदूMuslimमुस्लीम