शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पतीच्या हत्येसाठी पत्नीने कट रचल्याचा आरोप; द्वेषपूर्ण कमेंट करणारा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 19:29 IST

पहलगाम हल्ल्याबद्दल द्वेषपूर्ण कमेंट केल्याबद्दल जबलपूरमध्ये मोहम्मद ओसाफ खानला अटक

Pahalgam Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर सोशल मीडियावर द्वेषपूर्ण टिप्पण्या दिल्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट केल्याबद्दल मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये एका ३७ वर्षीय  आरोपी मोहम्मद ओसाफ खानला अटक करण्यात आली आहे. पर्यटकांच्या क्रूर हत्येबद्दल भडकाऊ आणि द्वेषपूर्ण टीका केल्याबद्दल ओसाफ खानला अटक करण्यात आल्याची माहिती जबलपूर पोलिसांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या एका व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप ओसाफ खान केला होता.

ओसाफ खान वैद्यकीय व्यवसायात असल्याचे समोर आले आहे. त्याने एका पोस्टच्या कमेंटमध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या पत्नीने त्याच्या हत्येसाठी हा सगळा कट रचला होता असं म्हटलं होतं. पहलगाम हल्ल्याची ही पोस्ट होती. जम्मू आणि काश्मीरमध्ये २२ एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांडात पती गमावलेल्या महिलेने त्याला मारण्यासाठी एका शूटरला कामावर ठेवले होते, अशी कमेंट ओसाफने केली. लग्नाच्या लाल बांगड्या घालून आणि तिच्या पतीच्या निर्जीव शरीराजवळ बसलेल्या महिलेचा हृदयद्रावक फोटो व्हायरल झाल्यानंतर लगेचच त्याने पोस्टवर कमेंट केली होती.

"या महिलेची चौकशी झाली पाहिजे. कदाचित तिने एका गोळीबार करणाऱ्याला कामावर ठेवले असेल आणि संधी मिळताच त्याने तिच्या पतीला मारले असेल," असे ओसाफ खानने म्हटलं. 

हल्ल्याच्या फक्त एक आठवडा आधी त्या महिलेचे लग्न झाले होते. पहलगाम हल्ल्यानंतर या महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ती, "आम्ही फक्त भेळपुरी खात होतो, बंदुक घेतलेली व्यक्ती तिथे आली आणि त्याने पतीला मुस्लिम आहे का विचारलं आणि गोळी मारली," असं रडत सांगत होती. 

ओसाफ खानच्या कमेंटमुळे संतप्त झालेल्या स्थानिक रहिवासी अभय श्रीवास्तव यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर खानला अटक करण्यात आली. मोहम्मद ओसाफ खान यांच्या वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, असे तक्रारदाराने म्हटले आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी ओसाफ खानला भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम १७० अंतर्गत अटक केली आहे. आता त्याला न्यायालयात हजर केले जाईल.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरMadhya Pradeshमध्य प्रदेश