वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये अमेरिकेचा दौरा करू शकतात. मोदींचा दोन वर्षांतील हा चौथा अमेरिका दौरा असेल. भारतीय पंतप्रधानांना अमेरिकन संसदेला संबोधित करण्यासाठी आमंत्रित करा, असा आग्रह प्रमुख संसद सदस्यांच्या एका गटाने काँग्रेसच्या (प्रतिनिधीगृह) सभापतींकडे धरला आहे. संसद सदस्य अॅड. रॉयस, इलियट अँजेल, जॉर्ज होल्डिंग आणि अॅमी बेरा यांनी सभापती पॉल रियान यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, मोदी यावर्षी ७ व ८ जून रोजी वॉशिंग्टनचा दौरा करू शकतात. तेव्हा त्यांना संसदेला मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित करावे. (वृत्तसंस्था)
मोदींचा जूनमध्ये अमेरिका दौरा ?
By admin | Updated: April 21, 2016 03:37 IST