नवी दिल्ली- दिल्लीत लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी भाषण करतील तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी ३६ महिलांची स्वॅट टीम असेल. महिलांची पहिली स्वॅट टीम १५ महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर सेवेत दाखल झाली आहे. या टीमला देशी-विदेशी तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. या महिलांच्या हाती अत्याधुनिक शस्त्रे असतील.सर्वांत कठीण ट्रेनिंगस्वॅट कमांडोंचे ट्रेनिंग अत्यंत कठीण असते. कोणत्याही स्थितीत दुष्मनाचा खात्मा करण्याची ताकद त्यांच्यात असते. त्यांना हवेत, पाण्यात आणि जंगलात आॅपरेशन फत्ते करण्यासाठी तयार केले जाते. अंधारातही दुश्मनांना टीपण्याची त्यांच्यात क्षमता असते. दहशतवादी आणि नक्षली आॅपरेशनसाठी ही टीम सज्ज असते. 2008 साली झालेल्या मुंबई हल्ल्यानंतर अशा टीमची आवश्यकता भासली. इतर अनेक देशांकडे अशी टीम अगोदरपासूनच आहे.
३६ महिलांच्या हाती मोदींची सुरक्षा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 04:37 IST