शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
2
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
6
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
7
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
8
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
9
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
11
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
12
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
13
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
14
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
15
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
16
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
17
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
18
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
19
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
20
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

मोदींची राजवट सर्वांत निराशाजनक

By admin | Updated: May 27, 2016 04:07 IST

स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केलेली सर्वाधिक निराशाजनक कामगिरी असे वर्णन काँग्रेसने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना केले आहे.

- काँग्रेसकडून दोन वर्षांचे मूल्यांकनशीलेश शर्मा,  नवी दिल्लीस्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने केलेली सर्वाधिक निराशाजनक कामगिरी असे वर्णन काँग्रेसने मोदी सरकारच्या दोन वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेताना केले आहे. आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले असताना उत्सव का साजरा केला जात आहे, असा सवाल करतानाच काँग्रेसच्या नेत्यांनी ‘भाषणवीर मोदी, कर्मवीर मोदी बनले नाहीत’ या शब्दांत टरही उडविली. दुसरीकडे भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मोदी सरकारने विकास आणि प्रगतीचे नवे परिमाण प्रस्थापित केल्याचा दावा केला आहे.मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना विविध पक्षांनी संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ही दोन वर्षे पोकळ आश्वासनांची राहिली. मोदीजी तुम्ही आनंदोत्सव का साजरा करीत आहात. देशभरात कुठे भरभराट झाली आहे काय, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते कपिल सिब्बल यांनी केला आहे. आर्थिक आघाडी, रोजगार ते परराष्ट्र धोरण अशा विविध मुद्द्यांवर सडकून टीका करताना गुरुवारी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकार आणि संपुआच्या काळातील मनमोहन सिंग यांच्या सरकारशी तुलनाही केली. मोदी सरकारचे अस्तित्व केवळ वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांवरील जाहिरातींमध्ये दिसून येते. डॉ. मनमोहन सिंग बोलत नव्हते, मात्र त्यांचे काम बोलायचे. मोदीजी केवळ बोलत असून त्यांचे काम काहीही बोलत नाही. या मुद्द्यावर मोदी मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्याने समोर यावे आणि आमच्याशी वादविवादाला सज्ज व्हावे, या शब्दांत सिब्बल यांनी आव्हान दिले.मोदी बनले घोषणामंत्री या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने कोणतेही काम केलेले नाही. मोदी हे घोषणामंत्री बनले आहेत, अशी टीका जेडीयूचे सरचिटणीस श्याम रजक यांनी केली. मोदींनी लोकप्रियता कायम ठेवण्यासाठी विविध फंडे अवलंबले आहेत. रालोआ सरकारने वृत्तपत्रांमधून मोठमोठ्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा सपाटा लावला असून स्वत:ची पाठ थोपटण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.जाहिरातींवर उडविले एक हजार कोटी दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रसिद्धीसाठी मोदी सरकारने जाहिरातींवर एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टिष्ट्वट जारी करीत केला आहे. याउलट दिल्ली सरकारचा पूर्ण वर्षभरातील खर्च १५० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे, असे त्यांनी नमूद केले. आप सरकारने जाहिरातींसाठी मोठी तरतूद केल्याबद्दल अलीकडे भाजपा आणि काँग्रेसने जोरदार टीका केली होती.मोदीजी उत्सव का साजरा करीत आहात?मोदीजी आपण उत्सव का साजरा करीत आहात. वाराणशी हा तुमचा मतदारसंघ स्वच्छ झाला काय? युवकांना रोजगार मिळाला काय? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? विदेशातून आलेला काळा पैसा लोकांच्या शेतात पोहोचला काय? देशाची निर्यात शिखरावर पोहोचली काय? पोकळ आश्वासने आणि क्लृप्त्यांखेरीज दाखविण्यासाठी काहीही नसताना या दोन वर्षांत असे काय घडले, ज्यामुळे तुम्ही उत्सव साजरा करीत आहात, असा रोकडा सवाल सिब्बल यांनी विचारला. ‘प्रगती की थम गई चाल दो साल देश का बुरा हाल’ हा लघुपटही काँग्रेसने जारी केला आहे. सरकारच्या कामगिरीची चिरफाड करतानाच या पक्षाने मोदी सरकारला दहा मुद्द्यांवर घेरले आहे. काँग्रेसच्या मुख्यालयात सिब्बल यांच्यासोबतच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, मीडिया प्रमुख रणदीप सूरजेवाला यांनी पत्रपरिषदेला संबोधित केले.‘अबकी बार हो गये बर्बाद’...मोदी सरकारने आपल्या कामगिरीकडे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्या जाहिराती दिल्या असताना ‘काँग्रेसने अबकी बार, हो गये बर्बाद’ हा नवा नारा व्हिडीओ संदेशातून दिला आहे. मोदींनी निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण करण्याऐवजी जनतेला काय दिले, हे सांगण्याचा प्रयत्न या व्हिडीओतून झाला आहे. सामाजिक तणाव पसरवून उन्मादजनक वातावरण निर्माण करणे हीच या सरकारची मोठी उपलब्धी राहिली आहे. सरकारने विकासाचा वेग किती वाढविला याचा खुलासा मोदींनी ‘मन की बात’मध्ये करावा, असेही सिब्बल म्हणाले. भाषणवीर मोदी, दोन वर्षांत कर्मवीर मोदी बनू शकले नाहीत. मोदींकडे केवळ भाषण असून प्रशासन नाही, असा टोलाही काँग्रेसच्या नेत्यांनी हाणला. आझाद म्हणाले की, जाहिराती, प्रचार, आत्मस्तुती, मीडिया व्यवस्थापन असलेले हे सरकार आहे. दोन वर्षांत या सरकारला अर्थव्यवस्थेत प्राण ओतता आले नाही. सर्वसामान्यांना दैनंदिन गरजांची पूर्तता करणे अवघड झाले आहे. महागाई आकाशाला भिडली आहे. डाळी, तेल, धान्य सर्व वस्तूंचे भाव वाढले आहेत. शेतकरी आत्महत्या करीत असताना सरकार उत्सव साजरा करण्यात मश्गुल आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरू आहे. हेच काय ते अच्छे दिन? फॉरेन पॉलिसी ही फौरन पॉलिसी बनली आहे, असे सांगत काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींच्या विदेश धोरणावरही टीका केली. मोदींनी वाटेल तेव्हा विमान वळवत पाकिस्तानात जाऊन चहा घेतला; पण संबंध आणखी बिघडले आहेत, असे ते म्हणाले.मोदी केवळ विमानातून ‘उडतात’संपुआ सरकारमधील योजनांची नावे बदलणे हीच मोदी सरकारची उपलब्धी आहे. अर्थव्यवस्था, कृषिधोरण कोलमडले आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नाही. या सरकारचे विदेश धोरणही अपयशी ठरले आहे. मोदी विमानातून उडत असतात. ते देशात बसून लोकांचे प्रश्न जाणून घेण्याच्या स्थितीत नाहीत.- के.एच. मुनियप्पा, काँग्रेसचे नेते