‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये मोदींचे नाव, ‘गुगल’चा माफीनामा

By Admin | Published: June 4, 2015 04:07 AM2015-06-04T04:07:02+5:302015-06-04T08:41:52+5:30

गुगल सर्चवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम व गैरसमज

Modi's name in 'Top 10 Criminals', 'apologize to Google' | ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये मोदींचे नाव, ‘गुगल’चा माफीनामा

‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये मोदींचे नाव, ‘गुगल’चा माफीनामा

googlenewsNext

नवी दिल्ली : गुगल सर्चवर ‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव आल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणावर संभ्रम व गैरसमज निर्माण झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘गुगल’ने बुधवारी माफी मागितली आहे. हा संपूर्ण प्रकार अस्वस्थ करणारा आहे. हे आमच्या मतांचे प्रतिबिंब नाही. काही वेळा एखादी गोष्ट शोधताना समोर येणारी छायाचित्रे धक्कादायक असतात. यामुळे निर्माण झालेले गैरसमज व संभ्रमाबाबत आम्ही माफी मागतो. असे प्रकार घडू नये यासाठी आम्ही आमची यंत्रणा सुधारण्यासाठी सातत्याने काम करत आहोत, असे ‘गुगल’च्या प्रवक्त्यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.
‘टॉप १० क्रिमिनल्स’मध्ये नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे एका ब्रिटिश दैनिक व सदोष ‘मेटाडेटा’मुळे आली असे ‘गुगल’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याप्रकरणात छायाचित्रांचा ‘सर्च’ करताना येणारे ‘रिझल्ट्स’ मोदी यांच्या बाबतीतील अनेक बातम्यांमधून एकत्रित होत होते. यात मोदी यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या राजकीय नेत्यांबाबत केलेल्या वक्तव्यांचा समावेश होता. या बातम्या मोदी यांना कुठल्याही गुन्हेगारी घटनांसोबत जोडत नाही आणि शब्द एकमेकांशी साधर्म्य साधत असल्यामुळे हे ‘रिझल्ट्स’ समोर आले असेदेखील ‘गुगल’तर्फे सांगण्यात आले.
दरम्यान, दिवसभर ‘गुगल’वर ‘टॉप १० क्रिमिनल्स’ असे
टाकल्यावर नरेंद्र मोदी यांची छायाचित्रे येत होती. यामुळे मोदी समर्थक भडकले व ‘टिष्ट्वटर’सह ‘सोशल मीडिया’वर ‘गुगल’वर टीकेचा भडिमार सुरू झाला. ‘टिष्ट्वटर’वर हाच मुद्दा ‘ट्रेन्डिंग’ होता. त्यामुळे ‘गुगल’वर जाऊन या ‘क्रिमिनल्स’ची माहिती घेण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. यात मोदींसमवेत अनेक भारतीयांची छायाचित्रे येत होती. पहिल्या १२ छायाचित्रांमध्येच मोदी यांचे छायाचित्र ३ वेळा आल्यामुळे मोदी समर्थकांची नाराजी वाढली.

Web Title: Modi's name in 'Top 10 Criminals', 'apologize to Google'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.