शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मोदींचा ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा, एक हजार दिवसांत प्रत्येक गावात फायबर ऑप्टिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 05:45 IST

कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.

नवी दिल्ली : कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन साध्या पद्धतीने शारीरिक अंतर राखत पार पडला. लाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी ‘मेक फॉर वर्ल्ड’चा नारा देत नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनचीही घोषणा केली. तब्बल ८६ मिनिटांच्या आपल्या भाषणात त्यांनी कोरोनाचे संकट आणि त्यावरील भारतीय लस, आत्मनिर्भर भारत मोहीम, परराष्ट्र नीती, नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन, प्रत्येक गावात फायबर आॅप्टिकसह विविध विषयांवर विस्ताराने भाष्य केले.भाषणाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान मोदी यांनी डॉक्टर, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्ब्युलन्स कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अनेक लोक २४ तास आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत असल्याचा आवर्जून उल्लेख करून पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या कार्याला नमन केले. कोरोनाच्या या संकटकाळात ‘सेवा परमो धर्मा’ची भावना आपल्यासोबत असल्याचे म्हटले.कोरोनाच्या संकटातही भारताने आत्मनिर्भर बनण्याचा संकल्प केला. अगदी काही महिन्यांपूर्वीपर्यंत एन ९५ मास्क, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स आपण परदेशातून आयात करत होतो. आज या सर्व वस्तू आपण स्वत:च्या गरजा भागवत इतर देशांनाही पुरवतो आहोत. आत्मनिर्भर भारत म्हणजे केवळ आयात कमी करणे नाही तर आपली क्षमता, सर्जनशीलता, कौशल्यही वाढवायला हवे. जगातील मोठमोठ्या कंपन्या आज भारताकडे वळत आहेत. ‘मेक इन इंडिया’सोबत ‘मेक फॉर वर्ल्ड’ मंत्रासह पुढे वाटचाल करायला हवी. कोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताने आघाडी घेतली आहे. आजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांनी हिरवा कंदील दाखविताच या लसींचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू केले जाईल. देशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>जम्मू-काश्मीरवासीयांना लवकरच मुख्यमंत्री मिळेलजम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये कार्बन न्यूट्रल विकास मॉडेल राबवण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. तसेच जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेचे काम वेगात सुरू आहे.ही प्रक्रिया पूर्ण होताच लवकरच तेथे निवडणुका होऊन जम्मू-काश्मीरच्या लोकांना आपला आमदार, आपला मुख्यमंत्री मिळेल, असे मोदी म्हणाले.>ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात संशोधनातही भारताची आघाडीआजमितीस भारतात तीन तीन लसींची चाचणी सुरूदेशाच्या प्रत्येक गरजवंतापर्यंत लस पोहोचवण्यासाठी आराखडा तयारगावागावात इंटरनेटचे जाळे निर्माण करण्याचे सरकारचे उद्दिष्टराष्ट्रीय शैक्षणिक धोरण नव्या भारताच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावणार>नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’: मोदी यांनी महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ची घोषणा केली. भारताच्या आरोग्य क्षेत्रात ही योजना मोठी क्रांती घडविणार आहे. तुमची प्रत्येक चाचणी, प्रत्येक आजार, कोणत्या डॉक्टरांनी कोणते औषध दिले, केव्हा दिले, अहवाल काय होते याची सर्व माहिती एका आरोग्य आयडीमध्ये उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.>लाल किल्ल्यावरील भाषणे; १९ वर्षांतील कालावधीलाल किल्ल्यावर सलग सातव्यांदा ध्वजारोहण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तब्बल ८६ मिनिटांचे भाषण केले. मागच्या १९ वर्षांतील तीन पंतप्रधानांचा लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिनाच्या भाषणाचा कालावधी पाहता मोदी यांची सात वर्षांची भाषणे ही आधीच्या पंतप्रधानांपेक्षा जास्त कालावधीची राहिली आहेत.(भाषणाची वेळ मिनिटांमध्ये)

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी