शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

गुजरातच्या गॅसवरून मोदी सरकारला घेरले

By admin | Updated: May 3, 2016 01:49 IST

कॅगच्या अहवालात गुजरातमधील केजी बेसीन गॅस प्रकल्पातील अनियमिततेवर बोट ठेवण्यात आल्यामुळे आयतेच कोलीत मिळालेल्या काँग्रेसने आक्रमकता दाखवत

नवी दिल्ली : कॅगच्या अहवालात गुजरातमधील केजी बेसीन गॅस प्रकल्पातील अनियमिततेवर बोट ठेवण्यात आल्यामुळे आयतेच कोलीत मिळालेल्या काँग्रेसने आक्रमकता दाखवत राज्यसभेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केल्यामुळे नवा वाद छेडला गेला आहे. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना सदर प्रकल्पाची घोषणा झाल्यामुळे विरोधकांनी त्यांना घेरण्याचे मनसुबे पक्के केल्याचे संकेत सोमवारी मिळाले. या प्रकल्पातील घोटाळा ३० हजार कोटी रुपयांच्या घरात असल्याचा आरोप करणाऱ्या काँग्रेसने मोदींच्या निवेदनाची मागणी लावून धरत दुपारपूर्वीच तीनदा राज्यसभेचे कामकाज तहकूब करण्यास भाग पाडले. दरम्यान राज्यसभेचे नेते अरुण जेटली यांनी कॅगच्या अहवालावर चर्चा करण्याची मागणी फेटाळून लावली.गुजरात राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या गॅस प्रकल्पासंबंधी (जीएसपीसी) अनियमिततेकडे अलीकडेच कॅगच्या अहवालात ताशेरे ओढण्यात आले आहे. विधानसभेच्या लोक लेखा समितीकडून कॅगच्या अहवालावर विचार केला जात असून संसदेत त्यावर चर्चेची परंपरा नाही, असे सरकारने स्पष्ट केले. या मुद्यावर चर्चेच्या नोटिशीबाबत सभापती अभ्यास करीत आहेत, असे उपसभापती पी.जे. कुरीयन यांनी नमूद केले. त्यावर समाधान न झालेल्या काँग्रेसने ‘प्रधानमंत्रीजी जबाब दो, जबाब दो’ अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले. कुरीयन यांनी सभागृहातील गदारोळ न थांबल्यामुळे सकाळी ११.३० वाजता, त्यांनतर १२.३२ आणि काही वेळातच पुन्हा कामकाज सुरू होताच ते तहकूब केले. गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (जीएसपीसी) बंगालच्या उपसागरातील केजी बेसीन गॅसफिल्डचे काम अयोग्य असल्याबद्दल कॅगने गुजरात सरकारला चपराक हाणली असल्याकडे काँग्रेसचे मधुसूदन मिस्त्री यांनी लक्ष वेधले. गुजरात पेट्रोलियम कॉर्पोरेशनमधील घोटाळा ३० हजार कोटींपेक्षा मोठा असल्याचा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)तृणमूलचा खासदार दिवसभरासाठी निलंबितप. बंगाल विधानसभा निवडणुकीत डाव्यांसोबत युती करणाऱ्या काँग्रेसला शह देण्याच्या उद्देशाने आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर सौद्याचा मुद्दा उपस्थित करीत राज्यसभेत जोरदार गदारोळ घालणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारावर दिवसभरासाठी निलंबित होण्याची पाळी आली. सभापती हमीद अन्सारी यांनी नियम २२५ नुसार त्यांना शिक्षा ठोठावताच या पक्षाच्या अन्य खासदारांनी सभात्याग करीत निषेध नोंदविला.मोदींची होती घोषणागुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री राहिलेल्या मोदी यांनी २००५ मध्ये जीएसपीसीची घोषणा केली होती. केजी बेसीन ब्लॉकमध्ये २० पद्म(ट्रिलियन) घनफूट गॅससाठा शोधण्याचे काम सोपविण्यात आले होते. प्रत्यक्षात त्या तुलनेत केवळ एक दशांश साठा मिळाला असून या शासकीय कंपनीच्या माथी ३१ मार्च २०१५ पर्यंत १९,७१६.२७ कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर चढविला गेला. कॅगने या प्रकल्पाच्या घोटाळ्याकडे अहवालात लक्ष वेधताना हा मुद्दा उल्लेखिला आहे. कुरीयन यांनी नोटीस न दिल्याचे सांगत चर्चेला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेसने हौदात उतरत घोषणा दिल्या.