शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात निवडणुकीच्या तारखांचा अधिकार मोदींनाच, चिदंबरम यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 03:36 IST

निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.

नवी दिल्ली/ अहमदाबाद : निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अखेरच्या निवडणुकीत रॅलीत आश्वासनांचा पाऊस पाडता यावा यासाठी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीची तारीख घोषित करण्याचा अधिकार बहाल केला आहे, या शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी हल्लाबोल केला.रविवारी मोदी गुजरात भेटीवर जात असून या राज्यात सर्व सवलतींची घोषणा केल्यानंतर गुजरात सरकार निवडणूक आयोगाला सुटी संपवत पुन्हा कामाला लावेल, असेही चिदंबरम यांनी एका पाठोपाठ एक जारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. पंतप्रधानांनी आपल्या अंतिम रॅलीत गुजरातच्या निवडणुकीची तारीख घोषित करावी यासाठी त्यांना अधिकार बहाल करण्यात आले आहेत. (कृपया त्यांनी त्याबाबत आयोगाला सूचित करावे) असा उपरोधिक टोलाही चिदंबरम यांनी हाणला.निवडणूक आयोगाने १२ आॅक्टोबर रोजी हिमाचल प्रदेशच्या निवडणुका ९ नोव्हेंबर रोजी घेण्याची घोषणा केली मात्र गुजरातबाबत निर्णय घोषित करण्याचे टाळले. हिमाचल प्रदेशमधील मतमोजणी होण्यापूर्वी म्हणजे १८ डिसेंबर पूर्वी गुजरातमधील निवडणूक होईल, असे आयोगाने नमूद केले असले तरी तारखा जाहीर करण्याचे टाळले. गुजरात विधानसभेच्या निवडणुका घोषित करण्यास विलंब लावण्यासाठी निवडणूक आयोगावर दबाव आणला जात आहे.मोदी १६ आॅक्टोबर रोजी आपले मूळगाव असलेल्या वडनगरला भेट दिली होती. त्यांना सांताक्लॉज बनून आश्वासनांचा पाऊस पाडण्याची संधी मिळावी यासाठीच निवडणूक आयोगाने तारखा घोषित करण्याचे टाळले, असा आरोप काँग्रेसने यापूर्वीही केला होता. कॉंग्रेसचे आरोप नैराश्यातून- भाजपकाँग्रेसने घाबरून अशी विधाने चालविली असल्याचा आरोप गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनीही केला. चिदंबरम आणि काँग्रेस पक्ष घाबरला आहे. निवडणुका योग्य वेळीच होतील. नैराश्यातून काँग्रेसने अशी भाषा चालविली आहे. लोकशाहीत निवडणूक आयोगावर टीका करणे योग्य ठरत नाही, असे ते गांधीनगर येथे प्रतिक्रिया देताना म्हणाले. काँग्रेसकडून संवैधानिक संस्थेवर निराधार आरोप केले जात आहे. या निवडणुकीत भाजप विजयी होणार या शक्यतेमुळे काँग्रेस पक्ष घाबरला आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही प्रत्युत्तर दिले.

टॅग्स :GujaratगुजरातIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस