शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मोदीजी, हेच भाजपचे संस्कार आहेत का?", राहुल गांधींवरील टीकावर केसीआर संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 15:26 IST

'राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, पण आम्ही त्यांना कधीही राजीव गांधी यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागितला नाही.'

नलगोंडा(तेलंगणा): तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांनी असामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या राहुल गांधींवरील वक्तव्यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. 'राहुल गांधी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागतात, पण आम्ही त्यांना कधीही राजीव गांधी यांचा मुलगा असल्याचा पुरावा मागितला नाही,' असे वक्तव्य हिमंत बिस्वा सरमा यांनी केले होते.

याच वाक्याचा संदर्भ देत के चंद्रशेखर राव यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर टीका केली. 'मोदीजी ही भाजपची संस्कृती आहे. ही आपल्या देशाची मर्यादा आहे का? शरमेने माझी मान झुकली आहे. तुमचे नेते एखाद्या मोठ्या नेत्याबद्दल खालच्या पातळीची टीका करतात, त्यांना पुरावे मागतात. देशासाठी ही चांगलील बाब नाही.

वेद, भगवत गीता, रामायण, महाभारतातून हीच शिकवण मिळाली आहे का ? हिंदू धर्माला विकून मतदान मागणाऱ्यांनो, तुम्ही खूप खराब लोक आहात. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांना असामच्या मुख्यमंत्र्यांना राहुल गांधींवरील वक्तव्यामुळे पदावरून हटवण्याची मागणी करतो, अशी टीका केसीआर यांनी केली.

हिमंत विस्वा सरमा यांचे वक्तव्य2016 साली झालेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर अनेकांनी त्या स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत. त्यावरुनच हिमंता बिस्वा सरमा यांनी राहुल गांधींवर टीका केली. उत्तराखंडमधील एका निवडणूक रॅलीत बोलताना ते म्हणाले की, 'बिपीन रावत यांच्या नेतृत्वाखालील सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा राहुल गांधींना हवा आहे. पण, आम्ही तुम्हाला राजीव गांधींचे पुत्र असल्याचा पुरावा मागितला का? लष्कराकडून पुरावे मागण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुमचा बिपिन रावत किंवा सैनिकांवर विश्वास नाही का? पाकिस्तानात घुसून हल्ला केल्याचे आमच्या सैनिकांनी सांगितले असेल तर ते अंतिम आहे, असे ते म्हणाले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीTelanganaतेलंगणा