शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरतील, पण 'पोट' शेतकरीच भरतो'

By महेश गलांडे | Updated: January 29, 2021 10:01 IST

शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय

नवी दिल्ली -  शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रजासत्ताकदिनी हिंसाचार घडविण्याचे कारस्थान केंद्र सरकारच्या मदतीने आखण्यात आले व पार पडले. या हिंसाचाराद्वारे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा मलीन करण्याचा केंद्र सरकारचा हेतू होता, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यानंतर, याप्रकरणी चांगलेच राजकारण रंगले असून विरोधी पक्षांनी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. केंद्र सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांवर गुन्हेही नोंदविण्यास सुरुवात केली असून आंदोलकांना हटविण्यासाठी पाऊले उचलली जात आहेत. यावरुन, विरोधक आक्रमक झाले आहेत.  

दिल्लीच्या सीमेवरील गाझीपूर सीमेसह इतर सीमांवर आंदोलन करत असलेल्या शेतकरी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांनी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आता एक बाजू निवडण्याची वेळ आली आहे. माझा निर्यण स्पष्ट आहे. मी लोकशाहीसोबत आहे. मी शेतकरी आंणि त्यांच्या शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनासोबत आहे. लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव आणि बिहारमधील माजी मंत्री तेजप्रताप यादव यांनीही मोदींना लक्ष्य करत टीका केलीय. मोदीजी, अदानी-अंबानी तुमची तिजोरी भरु शकतील, पण तुमचं पोट देशाचा शेतकरी भरतो, अशी आठवण यादव यांनी करुन केलीय. तसेच, तेजस्वी यादव यांनीही शेतकरी आंदोलनावरुन मोदी सरकावर टीका केलीय. शेतकरी आंदोलनात राजद पक्ष पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांसोबत आहे. सरकार, वडिल-मुलगा आणि जवान-किसान यांचं आपापसांत भांडण लावत असून देणगीदारांना फायदा पोहोचवत असल्याचा आरोप तेजस्वी यादव यांनी केलाय. आंदोलकांवरील सरकारकडून होणाऱ्या अत्याराचाचीह त्यांनी कडक शब्दात निषेध व्यक्त केलाय. 

शेतकऱ्यांना धमकावण्यात येतंय - प्रियंका गांधी

दरम्यान, राहुल गांधींच्या आधी त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले होते. प्रियंका गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या होत्या की, काल रात्री शेतकरी आंदोलन लाठीच्या बळावर संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करण्यात आळा. आज गाझीपूर आणि सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांना धमकावण्यात येत आहे. हे लोकशाहीच्या प्रत्येक नियमाच्या विरोधातील आहे. काँग्रेस शेतकऱ्यांसोबतच्या या संघर्षामध्ये उभी राहील. शेतकरी हे देशाचे हित आहे. जे शेतकऱ्यांना तोडण्याचा प्रयत्न करणारे देशद्रोही आहेत. प्रियंका गांधी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, आंदोलनातील हिंसक तत्त्वांवर कारवाई करण्यात यावी. मात्र जे शेतकरी शांततेने आंदोलन, संघर्ष करत आहेत. त्यांच्यासोबत देशाची जनता ही संपूर्ण शक्तीने उभी राहील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारMukesh Ambaniमुकेश अंबानीTej Pratap Yadavतेज प्रताप यादव