शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
2
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
3
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
4
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
5
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
6
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
7
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
8
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
9
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
10
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
11
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
12
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
13
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
14
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
15
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री
16
घराबाहेर पडताना आई तुम्हाला आवर्जून दही-साखर देते का? फायदे समजल्यावर रोजच मागाल
17
काय होता ५००० कोटींचा 'पॅनकार्ड' इनव्हेस्टमेंट फ्रॉड? ५१ लाख गुंतवणूकदारांना घातला गंडा
18
पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?
19
'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ
20
Operation Sindoor : "हौसले बुलंद हो, तो..." क्रिकेटचा किस्सा ऐकवत DGMO नी दिला स्पष्ट मेसेज, पाकचा 'खेळ खल्लास' कसा केला ते सांगितलं!

मोदींना हवी १ एप्रिलपासून जीएसटीची अंमलबजावणी

By admin | Updated: September 16, 2016 01:12 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढीलवर्षी १ एप्रिलपासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढीलवर्षी १ एप्रिलपासून महत्त्वाकांक्षी जीएसटीची अंमलबजावणी करण्याचे उद्दिष्ट ठेवत सर्वोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत. या तारखेपूर्वी जीएसटीसंबंधी सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत खबरदारी घेण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली.जीएसटी कायद्याची अंमलबजावणी आणि दरांबाबत वेळोवेळी शिफारशी देण्यासाठी जीएसटी परिषदेच्या सातत्याने बैठकी घेतल्या जाव्या, असेही त्यांनी सुचविल्या. माल आणि सेवेला जीएसटी कायद्यातून सूट दिली जाऊ शकते. जीएसटीच्या अंमलबजावणीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मोदींनी बुधवारी घेतलेल्या बैठकीत याबाबत आदेश दिले. १ एप्रिल २०१७ रोजी जीएसटीची अंमलबजावणी होण्याबाबत कोणतीही हयगय नको याची खातरजमा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीला अर्थमंत्री अरुण जेटली, पंतप्रधान कार्यालय आणि अर्थ मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी उपस्थित होते.मॉडेल जीएसटी कायदा आणि त्यासंबंधी तयार केले जाणाऱ्या नियमांच्या अंमलबजावणीसंबंधी प्रगतीचा आढावा घेण्यासह केंद्र आणि राज्य स्तरावर तयार केला जाणारा पायाभूत माहिती तंत्रज्ञानासंबंधी ढाचा, केंद्र आणि राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण तसेच व्यापार आणि उद्योगांमध्ये त्याबाबत केली जाणाऱ्या जनजागृृतीसंबंधी माहितीही त्यांनी जाणून घेतल्याचे पंतप्रधान कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.सर्वात मोठी करसुधारणास्वातंत्र्यानंतर देशात सर्वात मोठ्या करसुधारणेचे पाऊल म्हणून जीएसटीकडे पाहिले जाते. १ एप्रिलपासून नव्या आर्थिक वर्षात होणारे कराचे स्थित्यंतर अगदी सुरळीत व्हावे, यासाठी सरकारचे प्रयत्न राहतील. अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेची पहिली बैठक २२-२३ सप्टेंबर रोजी होत आहे. दोन महिन्यांत ही परिषद करदर आणि तरतुदींबाबत शिफारशी करेल. (वृत्तसंस्था)